कोरोनावर आधारित मराठी चित्रपट लवकरच 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 2 August 2020
  • कोरोना महामारीने अख्ख्या जगाला वेठीस धरले. त्यामुळे सर्व जग गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊन झाले आहे. आता याच विषयावर हिंदी व मराठी चित्रपट येणार आहेत.

मुंबई:  कोरोना महामारीने अख्ख्या जगाला वेठीस धरले. त्यामुळे सर्व जग गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊन झाले आहे. आता याच विषयावर हिंदी व मराठी चित्रपट येणार आहेत. इम्पा (इंडियन मोशन पिक्‍चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन) आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळामध्ये काही निर्मार्त्यांनी यासाठी चित्रपटांच्या नावाची नोंदणीही केली आहे.

आनंद एल. राय यांनी अर्ज केलेल्या "कोरोना व्हायरस' या नावाला मंजुरी मिळाली आहे; तर अन्य नावांना लवकरच मंजुरी मिळणार आहे. कोरोनामुळे सर्वसामान्यांना बसलेला फटका, आर्थिक मंदी, काही जणांचा झालेला मृत्यू अशा सगळ्या विषयावर हे चित्रपट बनणार आहेत. इम्पामध्ये "कोरोनाच्या आयचा घो' या नावाने मराठी चित्रपटाचे शीर्षक नोंदविण्यात आले आहे. तसेच, कोविड-19, कोविड-21, अराऊंड कोरोना, कोरोना 2020, कोरोना के रोना, कोरोना लॉकडाऊन, कोरोना व्हायरस,धारावी व्हर्सेस कोरोना 2020, गो कोरोना गो, हाय कोरोना, प्यार कोरोना अशी नावे इम्पामध्ये विविध प्रॉडक्‍शन हाऊसनी नोंदविली आहेत. त्यामध्ये भांडारकर एन्टरटेन्मेंट अराऊंडने कोरोना, कोरोना लॉकडाऊन आणि कोरोना 2020 अशी तीन नावे नोंदविली आहेत.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडेही लॉकडाऊन ऑफ लव्ह, लॉकडाऊन, लॉकडाऊन ऑफ रिलेशन, अशा काही नावांची नोंदणी करण्यात आली आहे

आम्ही 'लॉकडाऊन' या मराठी चित्रपटाची नोंदणी महामंडळात केली आहे. आम्ही पुढील महिन्यात चित्रीकरणाला सुरुवात करणार आहोत. लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी बजावलेले कर्तव्य एका प्रेमकहाणीद्वारे आम्ही दाखवणार आहोत.
- रणजित डोळे, निर्माते.

कोरोनामुळे अशा प्रकारचे लॉकडाऊन प्रथमच अनुभवत आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर "कोरोना' या नावाने शीर्षकांची नोदणी होत आहे. हा विषय निर्मात्यांनी अत्यंत गांभीर्याने आपल्या चित्रपटात हाताळावा. हास्यास्पद काही करू नये, असे मला वाटते.
- विकास पाटील, संचालक, इम्पा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News