'या' मराठमोळ्या तरुणीची आंतरराष्ट्रीय उबेर बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 12 September 2020

मालविकाला आता आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळाडू सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांच्या सोबत खेळण्याची संधी मिळणार आहे.

नागपूर : आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी एका मराठमोळ्या तरुणीची पहिल्यांदाच निवड झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आला. नागपूर येथील 18 वर्षीय तरुणी मालविका बनसोड हिची उबेर आंतरराष्ट्रीय बॅटमिंटन स्पेर्धेसाठी निवड करण्यात आली, त्यामुळे मराठी बाणा आता अटकेपार जाणार हे निश्चित झाले.

मालविकाला आता आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळाडू सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांच्या सोबत खेळण्याची संधी मिळणार आहे. मालविकाच्या निवडीमुळे राज्यातील खेळाडूंनी आनंद व्यक्त केला. 19 सप्टेंबर रोजी मालविकाचा वाढदिवस आहे. 'उबेर स्पर्धेसाठी माझी निवड करुन वाढदिवसानिमित्त बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने मोठा गिफ्ट दिले'. अशी भावना मालविकने प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केली.

अशा होणार स्पर्धा

  • 3 ते 11 ऑक्टोबर दरम्यान थॉमस, उबेर स्पर्धा 
  • 13 ते 18  ऑक्टोबर दरम्यान डेन्मार्क ओपन  स्पर्धा 
  • 20 ते २५ ऑक्टोबर दरम्यान डेन्मार्क मास्टर  स्पर्धा

गुरुवारी (ता.11) बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून थॉमस, कुबेर. डेन्मार्क ओपन आणि मास्टर या स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली. आणि संघ निश्चित करण्यात आला पुढील प्रमाणे:

थॉमस कप :

किदाम्बी श्रीकांत, पारुपल्ली कश्यप, लक्ष्य सेन, शुभंकर डे,  सिरील वर्मा, मनू अत्री, बी. सुमीत रेड्डी,  एम. आर. अर्जुन, घ्रुव कपिल, कृष्णाप्रसाद गरग.

उबेर कप:

सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, आकर्षी कश्यप, मालविका बनसोड, अश्विनी पोनप्पा, एन, सिक्की रेड्डी, पूजा दंडू, संजना संतोष, पूर्वीशा राम, जक्कामपुडी मेघना. 

डेन्मार्क कप:

सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू,  किदाम्बी श्रीकांत, अश्विनी पोनप्पा, एन, सिक्की रेड्डी.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News