मराठमोळ्या जेवणाची मेजवानी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 1 March 2019

स्वच्छता आणि शौचालय हा विषय हाताळत राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ चित्रपट रुपेरी पडद्यावर आणला. आता याच विषयावर भाष्य करणारा आणखी एक चित्रपट ते घेऊन येत आहेत.

‘मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर’ असं या चित्रपटाचं नाव आहे. याची खासियत म्हणजे यामध्ये मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.

अंजली पाटील, मकरंद देशपांडे, अतुल कुलकर्णी, नचिकेत पूर्णापत्रे यांसारखे मराठी कलाकार यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात मराठी कलाकार असल्यामुळे चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सगळ्यांना मराठी जेवणाचा आस्वाद घेता आला.

शिवाय प्रत्येक दिवशी सेटवर पूर्ण क्रुसाठी मराठी पद्धतीचे जेवण असायचे. सेटवरील प्रत्येकाला मराठमोळ्या पद्धतीच्या जेवणाची चव चाखता आली. एकूणच काय तर या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला मराठमोळ्या कलाकारांमुळे मराठी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेता आला.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News