या मराठी चित्रपटातून घडणार अमेरिकावारी  

सकाळ वृत्तसेवा ( यीनबझ )
Thursday, 4 April 2019

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्या ‘प्रवास’ चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली. पद्मिनीदेखील बऱ्याच वर्षांनंतर मराठी चित्रपट करत आहे. ‘प्रवास’मध्ये प्रेक्षकांना अमेरिकेचे दर्शन घडणार आहे.

अमेरिकेतील लॉस एन्जलिस, लॉस वेगास, फिनिक्‍स या भागात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. शशांक उदापूरकर दिग्दर्शित आणि ओम छंगानी फिल्म्स निर्मित या चित्रपटात नयनरम्य दृश्‍यांचा नजराणा पाहायला मिळणार आहे.

‘चित्रपटाच्या कथेनुसार काही भाग अमेरिकेत चित्रीत करण्यात आला. १७ दिवसांच्या चित्रीकरणाचा अनुभव काही वेगळाच असल्याचे दिग्दर्शक शशांक यांनी सांगितले. मराठी चित्रपटांनीही परदेशात चित्रीकरण करणे ही खरेच कौतुकास्पद बाब आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News