मुलाच्या उपचारासाठी मराठी कलाकार आर्थिक विवंचनेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 July 2020

कोरोनामुळे गेले तीन-साडेतीन महिने चित्रपटसृष्टी ठप्प आहे. त्यामुळे कित्येक कामगार व छोटी-मोठी काम करणाऱ्या कलाकारांचे संसार उद्‌ध्वस्त होण्याची वेळ आली आहे.

मुंबई : कोरोनामुळे गेले तीन-साडेतीन महिने चित्रपटसृष्टी ठप्प आहे. त्यामुळे कित्येक कामगार व छोटी-मोठी काम करणाऱ्या कलाकारांचे संसार उद्‌ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. हिंदी तसेच मराठी मालिकांमध्ये काम करणारे कलाकार अतुल विरकर यांनाही आपल्या अकरा महिन्यांच्या मुलाच्या उपचाराच्या खर्चासाठी वणवण करावी लागत आहे. लॉकडाऊनमुळे भिक्‍क्षूकीचा व्यवसाय बंद झाला. त्याचबरोबर चित्रीकरणही ठप्प झाले. त्यामुळे आता मुलाच्या पुढील उपचाराकरिता पैसे कुठून आणायचे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

"माझ्या नवऱ्याची बायको', "लव्ह लग्न लोच्या', "तू माझा सांगाती' अशा काही मराठी मालिकांबरोबरच "तारक मेहता का उल्टा चष्मा' अशा काही हिंदी मालिकांमध्ये तसेच चित्रपटामध्ये अतुल यांनी काम केले. यासोबतच ते भिक्‍क्षूकीचा व्यवसायही करतात. अनेक कलाकारांच्या घरी गणपतीला पौरोहित्यासाठी ते जातात; परंतु गेले चार महिने हाताला काम नसल्यामुळे ते मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

ठाण्यातील वर्तकनगर येथे ते आपल्या अकरा महिन्यांच्या मुलासोबत राहतात. त्याचे नाव प्रियांश. तो एक महिन्याचा असताना त्याला फीट आली. तेव्हापासूनच त्याच्या शरीरावरचे संतुलन राहत नाही. त्याचे वजनही खूप कमी आहे आणि त्याला डेव्हलपमेंट डिले डिसऑर्डर आहे. फेब्रुवारी महिन्यापासून त्याच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत उपचाराचा खर्च दोन ते अडीच लाख रुपये झाला आहे. मात्र पुढील उपचारासाठी त्याच्यांकडे पैसे नाहीत. रोजगार पुन्हा कधी सुरू होईल, हे सांगता येत नाही आणि मुलाच्या उपचारासाठी नेमके काय करायचे, अशा द्विधा अवस्थेत ते सापडले आहेत.
 

माझ्या मुलाला जन्मापासूनच मान पकडता येत नाही. त्यामुळे त्याच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत
जमविलेली सगळी पुंजी त्याच्यावर खर्च केली; मात्र आता उपचारासाठी काय करावे, कुठून पैसे आणावेत हे समजेनासे झाले आहे. सध्या कोरोनामुळे अंधेरी येथील एका क्‍लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत. त्यानंतर हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. त्याकरिता काही लाख रुपयांचा खर्च आहे. कुणी मदत केल्यास ती माझ्या मुलाला या आजारातून मुक्त होण्यास खूप उपयोगी ठरेल.
- अतुल विरकर

अशी करा मदत

  • स्टेट बॅंक ऑफ इंडिया
  • अतुल अशोक विरकर
  • खाते क्रमांक - 11252479538
  • आयएफसी कोड - SBIN0013035
  • शाखा - समता नगर, ठाणे पश्‍चिम
  • गुगल पे क्रमांक - 9967380241
  • मोबाईल क्रमांक – 9867935255

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News