या मराठी अभिनेत्रीला हिंदी मालिकांची भुरळ 

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ)
Tuesday, 5 March 2019

अभिनेत्री स्मिता सरवदेने आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं. ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेमधील स्मिताची भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली. सध्या ती ‘सोनी सब वाहिनी’वरील ‘भाकरवडी’ मालिकेमध्ये ज्योत्स्ना गोखले नावाचं पात्र साकारत आहे.

मराठी मालिकांमध्ये काम करण्यापूर्वी तिने हॅट्‌सऑफ प्रॉडक्‍शन्ससह हिंदी इंडस्ट्रीमध्येही काम केलं. परंतु ‘भाकरवडी’मधील तिची भूमिका प्रकाशझोतात आली. मराठी तसेच हिंदी मालिकांमध्येही काम करण्याचा आनंद वेगळाच असल्याचं स्मिताच म्हणणं आहे.

‘मी या मालिकेआधीही हिंदीमध्ये काम केलं आहे. मी जशी मराठी इंडस्ट्रीमध्ये रमले, तशी हिंदी इंडस्ट्रीमध्येही रमले. मला दोन्ही भाषेतील मालिकांमध्ये फारसा फरक जाणवत नाही. मी माझ्या कामाचा आनंद घेते.’

या मालिकेमधील बऱ्याच कलाकरांबरोबर स्मिता पहिल्यांदाच काम करतेय. दोन कुटुंबीयांची कथा या मालिकेत गमतीशीर आणि विनोदी पद्धतीने मांडली आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News