मराठमोळा प्रसाद जवादे बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर झळकणार

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Wednesday, 5 February 2020
  • आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी ,अमृता खानविलकर यांसारखी तगडी अशी स्टारकास्ट असलेल्या कलाकारांबरोबर मराठमोळा प्रसाद जवादे हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून लवकरच "मलंग" हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जातंय.
  • अभिनेता प्रसाद जवादे याचा रोल देखील अतिशय इंटरेस्टिंग आहे असे त्याच्याशी बातचीत करताना समजले. 

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक मोहित सूरी यांचं दिग्दर्शन असलेल्या बहुचर्चित आणि बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या "मलंग" या चित्रपटाविषयी महाराष्ट्रातील  सिनेरसिकांची मोठ्या प्रमाणावर उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मलंग या चित्रपटामध्ये आपली सर्वांची लाडकी अमृता खानविलकर तर रुपेरी पडद्यावर झळकणारच आहे पण त्यासोबत आणखी एक मराठी अभिनेता "मलंग" मध्ये पदार्पण करणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी ,अमृता खानविलकर यांसारखी तगडी अशी स्टारकास्ट असलेल्या कलाकारांबरोबर मराठमोळा प्रसाद जवादे हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून लवकरच "मलंग" हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जातंय. अभिनेता प्रसाद जवादे याचा रोल देखील अतिशय इंटरेस्टिंग आहे असे त्याच्याशी बातचीत करताना समजले.

प्रसाद जवादेला आपल्या सहकलाकारांसोबत कोंकणी भाषेत संवाद साधायचा असल्याने त्याने कोंकणी संवादावर विशेष मेहनत घेतली असल्याचे दिसतंय. तसेच त्याने ह्यावर प्रचंड मेहनत घेतली असून आपला गोव्यातील कोंकणी मित्राकडून कोंकणी भाषेचे धडे गिरवताना दिसत आहे 

त्याचबरोअबर त्याने "मलंग" या चित्रपटाचे बारकाईने आणि उत्तम असे दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शक मोहित बासुरीचे देखील विशेष कौतुक केले आहे.दिग्दर्शक मोहित सूरी हा अतिशय क्रिएटिव्ह असा दिग्दर्शन करणारा उत्तम असा दिग्दर्शक असून त्याने या चित्रपटाविषयी प्रचंड मेहनत घेतली आहे असेही त्याने यावेळे स्पष्ट केले. त्यामुळे बहुचर्चित असा "मलंग " हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करतो का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News