मराठीच्या "अभिजात दर्जे"साठी मनसेची हॅशटॅग मोहीम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

#अभिजात भाषा मराठी या हॅशटॅगचा वापरत सोशल मीडियावर मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेला मोठ्या प्रमाणात पाठींबा द्यावा असे आवाहन काळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठी भाषेच्या अभिजात दर्जेच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. काही दिवसांपूर्वीच  नरेंद्र मोदींना १० हजार पोस्टकार्ड पाठविण्यात एनच्याही माहिती मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिली होती. त्यानंतर आता सोशल मीडियावर मनसेची नवी मोहीम सुरु करण्यात आली आहे. #अभिजात भाषा मराठी या हॅशटॅगचा वापरत सोशल मीडियावर मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेला मोठ्या प्रमाणात पाठींबा द्यावा असे आवाहन काळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 

 

मराठीने अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासंदर्भातील सर्व निकष पूर्ण करून आता साडेचार वर्ष उलटली आहेत. तमिळसह संस्कृत, तेलगु, कन्नड, मल्याळम, ओडीआ या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मग मराठीला का नाही? असा सवाल गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या भाषा तज्ञांनी एकमताने मराठीच्या बाजूने शिफारस केलेली असतानाही केंद्र सरकार ही घोषणा करायला टाळाटाळ करत असल्याचा आरोप काळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

 

 

 

 

काही दिवसांपूर्वीच पठारे समितीचे समन्वयक हरी नरके यांनी व्यक्त केले होते. एवढं होऊनही राजकीय दबाव होत असल्याने मराठीला अभिजात दर्जा मिळत नाहीये. मात्र आता मराठीला वाचविण्यासाठी दबाव निर्माण करण्याचे काम हे नागरिकांचे आहे, असं काळे यांनी सांगितलं आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News