आफ्रिकेच्या माउंट किलीम्यांजरोवर फडकणार मराठमोळा तरूण झेंडा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 January 2020
  • सागर विजय नलवडे सह्याद्रीत मिळालेली ओळख शिलेदार.
  • मुळगाव करनूर, कोल्हापूर सध्या कामानिमित्त मुबंई. मागील दहा वर्षापासुन सतत सह्याद्रीत भटकंती करत आहे. 

सागर विजय नलवडे सह्याद्रीत मिळालेली ओळख शिलेदार. मुळगाव करनूर, कोल्हापूर सध्या कामानिमित्त मुबंई. मागील दहा वर्षापासुन सतत सह्याद्रीत भटकंती करत आहे. 

आजवर सह्याद्रीत बरीच भटकंती केली, दुर्ग अभ्यास, दुर्गभटकंती, दुर्गसंवर्धन, गिर्यारोहण, समाजकार्य, सोहळे भटकंती कट्टे, राष्ट्रकार्य, या सर्वच क्षेत्रात कार्यरत आहे. आजवर अनेक सह्यभटक्याना सह्याद्री फक्त दाखवलाच नाहितर जगायला शिकवला आहे. विसापुर, सुधागड, आसावा, कोळदुर्ग, जुना पन्हाळा, लिंगाणा, सुमारगड, महिमानगड, कावळ्यागड ई. गडावर गडसंवर्धन कार्यात योगदान देऊन सह्याद्रीची ऊतराई केली आहे.

महाराष्ट्रातील अतिशय अवघड असा लिंगाणा किल्ल्याचा सुळका आजवर 26/30 आरोहण मोहिमा घेऊन 1300 भर सह्यभटक्याचें लिंगाणा आरोहणाचे स्वप्न पुर्ण केले आहे. दिनाकं 21 मार्च 2019 रोजी मी  लिंगाणा सुळका फक्त 16 मिनीट 40 सेकदांत विनासाहित्य सर करुन सह्याद्रीचे नाव महाराष्ट्रासोबतच देश व जागतीक पातळीवरहि नेले आहे.
या विक्रमाची नोदं INDIA BOOK OF RECORD / HIGH  RANGE WORLD RECORD मध्ये हि झाली आहे.

शिवछत्रपतीचें आशिर्वाद व तुम्हा सर्वाच्या मदतीने आता सह्याद्रीतील भटकंती सोबतच जागतीक पातळीवरील काहि मोहिमाचे नियोजन सुरु केले असुन युरोप खंडातील Mount Elbrus हे 5642 मीटर ऊचींचे रशिया येथील सर्वात ऊचं शिखर 15 ऑगस्ट 2019 या दिवशी सर करुन स्वातत्रदिनी आपला राष्ट्रध्वज तिरगां व आपला भगवा ध्वज फडकवला आहे तसेच रायगडवरील माती शिवछत्रपतीची प्रतिमा या शिखरावर नेऊन कोल्हापुरी फेटा बाधुंन राष्ट्रगित म्हणत देशाला अभिवादन करुन रेकॉर्ड केला आहे. तसेच 14 ऑगस्ट रोजी Mount Elbrus बेस कॅम्पवर 73 फुट आपला प्राणप्रिय तिरंगा ध्वज फडकवून तिरंगा ध्वजाला  सलाम करुन परदेशात इतका मोठा राष्ट्र ध्वज फडकवण्याचा विक्रम केला आहे. या विक्रमाची नोदं INDIA BOOK OF RECORD / HIGH  RANGE WORLD RECORD मध्ये हि झाली आहे.

आता माझे पुढिल ध्येय आफ्रिका खंडातील टाझांनिया येथील Mount Kilimanjro हे 5895 मीटर उचीचे हिमशिखर 26 जानेवारी 2020 रोजी प्रजासत्ताक दिनी सर करण्याचे असुन या मोहिमेसाठी आपणा सर्वाची मदत मला हवी आहे. जागतीक पातळीवरील या मोहिमांच्या माध्यमातून मला जागतीक पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अन आपली संस्कृती पोहचवत तिकडील लोकांना आपला सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अन आपली संस्कृती दाखवण्यासाठी आणायचे आहे.

सह्याद्रीमध्ये भटकंती करत असताना आजवर आपण बरीच मदत केली आहे तसेच जागतीक पातळीवरील 7 Summit मोहिमेतील रशिया येथील Mount Elbrus Russia मोहिमेसाठीहि आपण खुप मदत केली अहात तसेच आता या Mission Mount Kilimanjro Afrika व ईतर मोहिमेसाठीहि आपली मदत हवी आहे.

माझी हि मोहिम फक्त माझी नसुन तुम्हा सर्व मार्गदर्शक, सह्याद्री मित्राची आहे तेव्हा सर्वाचे सहकार्य अपेक्षित आहे. खाली माझा खातेक्रमाकं देत आहे त्यावर अथवा ज्या गिर्यारोहण संस्थेमार्फत मी हि मोहिम करत आहे त्याच्या खात्यावर मदत करावी हि विनंती, आणि मला विश्वास आहे या जागतीक पातळीवरील या मोहिमानसाठी तुम्ही सर्व मला मदत करुन आपले सह्याद्रीचे नाव मोठे करत जगतीक पाळीवर नेण्यासाठी करण्यासाठी मदत कराल.  मी जरी हि मोहिम करत असेल तरी तिकडील एक एक मोहिम केल्यावर पुन्हा  सह्याद्रीतील दगड ऊचलत गडसंवर्धन करण्यास हा शिलेदार पुन्हा ऊभा असेल हा शब्द देतो. तसेच माझी काही स्वप्ने सह्याद्रिशी निगडीत मोठी आहेत ती साकार झाल्यावर तुम्हा सर्वाना एक वेगळच समाधान वाटेल हा विश्वास देतो.

माझा हात जरी आभाळाला लागला तरी पाय जमिनिवर ठेऊन आयुष्यभर या संह्याद्रीची ऊतराई करत राहणार आहे. शेवटि सह्याद्रीशी आपली नाळ जुडलेली आहे. पुन्हा एकदा आर्थिक मदतिचे अवाहण करतो, हि मोहिम तुम्हा सर्वाची आहे.  'शिलेदार' आपल्या स्वप्नांची पूर्तता करून भारतीय तिरंगा  ध्वज आफ्रिका येथील 'माउंट किलीमाजंरो' शिखरावर 26 जानेवारी 2020 रोजी प्रजासत्ताक दिनी फडकवेल ही वचनबद्धता देतो...!

धन्यवाद 

आपलाच 

#शिलेदार
संपर्क - 9022556690

खाते क्र. 

Payment Details

SHILEDAR ADVENTURE INDIA

HDFC Bank, Kamothe, Panvel

Current Account - 

A/c No. - 50200044689652

IFSC Code  -  HDFC0003997              

Phone Pay / Google Pay No - 9022556690

(मदत पाठवल्यावर कृपया मला वाट्स वर आपली माहिती द्यावी कारण तुम्हा सर्वांचे आभार मानणे माझे कर्तव्य आहे. आपली 100 रु. मदतहि खुप मोठी आहे)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News