मॉडेलिंग क्षेत्रातील, चंदेरी दुनियेची अनेकांना भुरळ

भाग्यश्री गुरव
Thursday, 16 January 2020

३४ वर्षांपासून शहरात फॅशन शो करीत आहोत. ‘फॅशन शो’ केवळ तरुण-तरुणींपुरतेच मर्यादित राहिले नसून आता आई आणि मुलगी तसेच मुलगाही या शोमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत

नाशिक : फॅशन-मॉडेलिंगच्या क्षेत्रात तरुणाईचे वाढते आकर्षण लक्षात घेता अनेक संस्थाही आता या क्षेत्रात उतरल्या आहेत. मॉडेलिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना अनेक संस्थांद्वारे हातात माइक पकडण्यापासून ते चालण्याचे, बोलण्याचे, हावभावाचेही प्रशिक्षण देण्यात येत आहे. याचबरोबर सौंदर्यविषयक काळजी, आहार आणि पथ्य, कपडे इत्यादींची माहिती दिली जाते. या संस्थांकडून प्रशिक्षणाचा मोठा खर्चही घेतला जातो. मात्र शहरात मॉडेलिंगचे प्रशिक्षण देणारी संस्था नसल्याने तरुणांना पुणे-मुंबईची वारी करावी लागत आहे. 

मॉडेलिंगच्या क्षेत्राची आणि चंदेरी दुनियेची अनेकांना भुरळ पडली आहे. त्यामुळे अनेक तरुण उत्कृष्ट मॉडेल बनण्याचे स्वप्न आता बघू लागले आहे. मात्र यासाठी लागणारे योग्य प्रशिक्षण आणि माहिती नसल्याने तरुणांना मॉडेलिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या संयोजकांची मदत घ्यावी लागते. आठ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी तरुणांना तीन ते चार हजार रुपये मोजावे लागतात. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी तब्बल पन्नास हजार रुपये मोजावे लागतात. यामध्ये कपड्यांसह लागणारा इतर खर्च हा प्रशिक्षणार्थी मॉडेलला स्वतः करावा लागतो. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News