परकीय भाषेचं ज्ञान असणाऱ्या शिक्षकांना अनेक संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020
  • आपल्याकडे देखील काही महाविद्यालयांमध्ये जर्मन, फ्रेंच असे विषय शिकवले जातात.

फ्रेंच व जर्मनचे दिवस संपून एक तप झाले. मँडेरिन, जपानी, कोरियन, अरेबिक, स्पॅनिशचा जमाना चालू आहे; पण ना आमची कॉलेज बदलतात, ना पालक-विद्यार्थी. कोणत्याही बारावीनंतर यातील क्रॅश कोर्सस यू ट्यूबवरून सुरू करता येतात.

आवडले, तर पदवीनंतर त्यातील डिप्लोमा मिळवता येतो. ऑडिओ-व्हिडिओ माध्यमातून घरबसल्या याचे अभ्यास होऊ शकतात. गरज एकच आहे, पदवी समकक्ष इंग्रजी चांगले हवे. या विषयातील शिक्षकांना मागणी वाढते आहे.

मुख्य म्हणजे कामाकरता या देशात जाणारे वाढत आहेत; पण त्यांना तीन महिन्यांत किमान गरजा शिकवणारे उपलब्धच नाहीत.

त्यामुळे विविध परदेशी भाषांचे शिक्षकांची मागणी भारतासोबतच इतर देशातही वाढली आहे. आपल्याकडे देखील काही महाविद्यालयांमध्ये जर्मन, फ्रेंच असे विषय शिकवले जातात. त्यासाठी शिक्षकांची मागणी असते.

हे विषय शिकल्यास निकराची मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. अनेक भाषांमध्ये पारंगत असल्याने परदेशी संधी देखील चालून येतात. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News