अभियांत्रिकी क्षेत्रात अनेक नोकऱ्यांची संधी...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 February 2020

भारतात अभियांत्रिकी महाविद्यालयाची संख्या सुमारे ३,२०० पर्यंत आहे. महाराष्ट्रात सुमारे ३५० अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. त्यामुळे उत्तम असे अभियांत्रिकीचे करिअर करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील कंपन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मिळत आहेत.

आजच्या परिस्थितीचा विचार केल्यास जगात सर्वत्र अभियांत्रिकीचा चांगलाच बोलबाला दिसतो. भारताला महासत्ता बनायचे असल्यास तंत्रज्ञान व संशोधनावर आधारित अर्थव्यवस्थेकडे वेगाने जावे लागेल.

आयुष्यातील महत्त्वाची ३ ते ४ वर्षे शिक्षणासाठी दिल्यानंतर व पालकांच्या कष्टाची काही लाख रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याचे व देश विदेशात फिरण्याची संधी देणाऱ्या उपलब्ध पर्यायात अभियांत्रिकीच्या करिअरला प्राधान्य आहे.

मेगा नोकरभरती करणाऱ्या कंपन्या हजारोंच्या संख्येने अभियंत्यांना नोकऱ्या देतात. यंदाचे वर्ष तर अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रचंड आशादायी आहे. कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून यंदा नोकऱ्यांचा पाऊसच अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पडत आहे. 

कॅम्पस प्लेसमेंट आणि नोकऱ्या
कंपनी           दिल्या जाणाऱ्या नोकऱ्या
TCS               २५,००० ते ३०,०००
Infosys           २५,००० ते ३०,०००
Accenture     २०,०००  ते  २५,००० 
Capgemini     १५,०००  ते २०,०००
Cognizant      १५,५००  ते  २३,०००

अभियंत्यांसाठी प्रामुख्याने खालील प्रकारच्या कंपन्या नोकरीच्या संधी देत असतात.

1.IT Product
या कंपन्या स्वतःचे विविध प्रॉडक्ट बनवतात, उदाहरणार्थ आपण वापरतो ती पीडीएफ फाईल Adobe कंपनीने तयार केलेले सॉफ्टवेअर प्रॉडक्ट आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे प्रोफाईल या प्रकारच्या कंपन्यांत दिले जाते.

या प्रकारच्या कंपन्यांत कर्मचाऱ्यांची संख्या कमी असली, तरी जॉब प्रोफाईल चांगले असते. विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळते. पगारदेखील चांगला असतो. उदा. Google, Facebook इत्यादी.
 

2.IT Services

या कंपन्यांमध्ये IT Product  कंपन्यांनी तयार केलेल्या प्रॉडक्ट्सला सपोर्ट देण्यासाठी मनुष्यबळाचा वापर केला जातो. या कंपन्यांत खूप प्रचंड प्रमाणावर मनुष्यबळाची गरज असते. भारताच्या अर्थव्यवस्थेत व निर्यातीतदेखील त्यांचा खूप मोठा वाटा आहे. मात्र काही IT Services कंपन्या स्वतःचे छोटे प्रॉडक्टदेखील बनवतात.

अनेक  IT Service कंपन्यांमध्ये Core Technical प्रोफाईल्स देखील उपलब्ध असतात व चांगल्या प्रतीच्या विद्यार्थ्यांना जास्त पगार दिले जातात. कॉम्प्युटर, आयटी शाखेच्या विद्यार्थ्यांबरोबरच इतर शाखांच्या विद्यार्थ्यांनाही या कंपन्या मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या देतात.

उदा. Infosys, Wipro, Capgemini, Accenture, TCS इत्यादी 

3.Core

उत्पादन तसेच ऑटोमोबाईल्स क्षेत्रातील कंपन्यांना मेकॅनिकलसाठी कोअर कंपनी संबोधिले जाते. त्याच प्रमाणे बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांना सिव्हिल अभियांत्रिकीसाठी कोअर कंपनी म्हटले जाते उदा. TATA Motors, Godrej, KPIT Technologies इत्यादी.

4.Consulting

या कंपन्या इतर कंपन्यांना व्यावसायिक सल्ला देण्याचे काम करतात उदा. KPMG, Mckinsey इत्यादी.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News