अकरावीच्या इतक्या विद्यार्थ्यांना मिळाले पसंतीचे कॉलेज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 31 August 2020

अकरावीच्या इतक्या विद्यार्थ्यांना मिळाले पसंतीचे कॉलेज

अकरावीच्या इतक्या विद्यार्थ्यांना मिळाले पसंतीचे कॉलेज

महाराष्ट्र - रविवारी सायंकाळी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये १ लाख १७ हजार ५२० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून यातील ४० हजार ४७६ विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. सायन्स, कॉमर्स आणि शाखेचा कटऑफ ९४ टक्क्यावर आहे. तर मुंबईतील नामांकित कॉलेजचा कॉमर्स शाखेचा कटऑफ ९० टक्क्यांवर आहे.

असंख्य बोर्डाच्या २ लाख १२ हजार १५२ विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज केला होता. यापैकी ९४ हजार ६३२ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत कॉलेज मिळालेलं नाही. मुंबई विभागात सायन्स, कॉमर्स, आर्टस् आणि एचएसव्हीसी शाखेच्या एकूण २ लाख २० जागा आहेत. सध्या ज्यांनी पहिल्या यादीत आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी ३ सप्टेंबरपर्यंत कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे कॉलेज मिळाले आहे, त्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असेल. मिळालेल्या मुदतीत प्रवेश न घेतल्यास त्यांना पुढील यादीत प्रवेश मिळणार नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News