तब्बल ४२ देशांना बसला "जी मेल" बिघाडीचा फटका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 August 2020
  • गुरुवारी २० ऑगस्ट रोजी जगभरातील अनेक लोकांना जी मेल बिघाडाचा फटका बसला.
  • गुगलच्या जी मेल यंत्रणेत गुरुवारी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेल वरून संदेश पाठविण्यात अनेकांना अडचणी येत होत्या.

नवी दिल्ली :- गुरुवारी २० ऑगस्ट रोजी जगभरातील अनेक लोकांना जी मेल बिघाडाचा फटका बसला. गुगलच्या जी मेल यंत्रणेत गुरुवारी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेल वरून संदेश पाठविण्यात अनेकांना अडचणी येत होत्या. जगभरात सध्या कोरोनाने थैमान घातल्यामुळे अनेक व्यवसायातील लोक सध्या घरूनच काम करण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. अश्यावेळेस गुगलच्या जी मेल यंत्रणेचा वापर हा मोठ्याप्रमाणात होत असतो आणि अश्यावेळेस जी मेल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अनेक लोकांचा खोळंबा झाला. गुरुवारी सकाळी अकरा वाजल्यापासून ते पुढील दोन ते तीन तास जी मेल यंत्रणेत बिघाड झाला होता. अनेक लोक सकाळी कामाची सुरुवात करताना त्यांना पाठवण्यात आलेले मेल वाचतात तसेच आवश्यक असल्यास त्याला रिप्लाय देखील करतात. परंतु अशा लोकांच्या कामाचा यावेळी खोळंबा झाला. अनेक जणांच्या म्हणण्यानुसार यावेळेत गुगल अटॅचमेंट्स पाठवण्यात खूप उशीर लागत होता तसेच अनेकांना गुगलवर लॉगिन करण्यासही अडथळे निर्माण होत होते.  गुगल ड्राइव्ह यासारख्या यंत्रणा देखील कामकरत नसल्याने त्यावर अवलंबून असलेल्या लोकांना अनेक अडचणी येत होत्या. 

जी मेल मध्ये झालेल्या बिघाडामुळे घरून काम करणाऱ्या कर्मचारांना नाहक त्रास झाल्यामुळे हताश झालेल्या नेटकऱ्यांनी या संदर्भात आपली व्यथा सोशल मीडियाद्वारे मांडली तर काहींनी जी मेल मध्ये बिघाड झाला नसल्याचे सांगितले. भारत, अमेरिका, यूरोपातील देश, न्यूझीलंड, फिलिपिन्स यासारख्या अन्य ४२ देशातील लोकांना देखील या जी मेल बिघाडीचा फटका बसल्याचे एका ट्रेकिंग वेबसाईटने म्हंटले आहे. गुगल यंत्रणेमध्ये काय नेमका काय बिघाड झाला होता याचा तज्ञ शोध घेत आहेत. त्याचप्रमाणे गुगल यंत्रणेत जो काही बिघाड झाला तो लवकरात लवकर दुरुस्त केला जाईल असे देखील गुगलने सांगितले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News