प्रियकरासोबत मानसी नाईकने दिली प्रेमाची जाहीर कबुली 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 February 2020
  • प्रियकर प्रदीप खरेसोबत हा तिने फोटो अपलोड केला असून तिने आपल्या भावनांना देखील मोकळी वाट करून दिली आहे,तशा आशयाचा संदेशदेखील त्याने फोटोसोबत शेअर केला आहे.
  • मानसीने आपल्या प्रियकराच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिलेली हि कबुली हि चांगलाच चर्चेचा विषय ठरतेय.

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तसेच ख्यातनाम नृत्यिका मानसी देशपांडे हि सध्या चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. सध्या तिच्या नावाची चांगलीच चर्चा सिनेवर्तुळात रंगतेय मात्र हि चर्चा तिच्या आगामी चित्रपटाबाबत नसून तिने दिलेल्या प्रेमाच्या जाहीर कबुलीबद्दल आहे.

मानसी नाईकने नुकतीच त्याबाबतीची पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तसेच तिने आपल्या प्रियकरासोबतचा फोटो देखील आपल्या अधिकृत  इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे.

प्रियकर प्रदीप खरेसोबत हा तिने फोटो अपलोड केला असून तिने आपल्या भावनांना देखील मोकळी वाट करून दिली आहे,तशा आशयाचा संदेशदेखील त्याने फोटोसोबत शेअर केला आहे.मानसीने आपल्या प्रियकराच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिलेली हि कबुली हि चांगलाच चर्चेचा विषय ठरतेय.

मानसी नाईकचा प्रियकर प्रदीप खरे हा त्यामुळे चांगलाच लाईमलाइट मध्ये आला असून त्याच नाव हे चर्चेचा विषय ठरतंय. प्रदीप खरे हा प्रोफेशनल बॉक्सर असून भारताचं प्रतिनिधित्व देखील केले आहे. एशियन वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेमध्ये त्याने विजेतेपद सुद्धा पटकावले आहे.     

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News