मानसी जोशी; विश्व पॅरा बॅडमिंटन चषक जिंकणारी पहिली भारतीय महिला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 28 August 2019

जागतीक पातळीवर झालेली पॅरा बॅडमिंटन चषक स्पर्धा जिंकणारी मानसी जोशी ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. सिंगल महिला एसएल-3 फायनलमध्ये हमवतन पारुल परमार हिला 21-12, 21-7 अशा गुण फरकाने हारवून मानसीने ही स्पर्धा आपल्या नावावर केली आहे.

स्वित्झलॅंड -  जागतीक पातळीवर झालेली पॅरा बॅडमिंटन चषक स्पर्धा जिंकणारी मानसी जोशी ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. सिंगल महिला एसएल-3 फायनलमध्ये हमवतन पारुल परमार हिला 21-12, 21-7 अशा गुण फरकाने हारवून मानसीने ही स्पर्धा आपल्या नावावर केली आहे.

2011मध्ये एका दुर्घटनेत मानसीचा डावा पाय निकामी झाला होता, मात्र न हारता तिने आपला सराव सुरूच ठेवला होता. अखेर शनिवारी झालेल्या सामन्यादरम्यान विश्व विजेती ठरलेल्या परमारला हारवून मानसी ही विश्वविजेती बनली आहे. त्यामुळे फक्त पी. व्ही. सिंधू नाही तर तिच्यासोबत मानसी जोशीही जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News