मनोज बोरगावकर यांच्या 'नदीष्ट'ला स्व. दिवाकर चौधरी कादंबरी लेखन पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 August 2020
  • प्रसिद्ध कवी मनोज बोरगावकर यांच्या 'नदीष्ट' या बहुर्चित कांदबरीला जळगाव येथील मानाचा स्व. दिवाकर चौधरी सर्वोत्कृष्ट कादंबरी लेखन पुरस्कार जाहिर झाला आहे.
  • एकतीस हजार रूपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

नांदेड :- प्रसिद्ध कवी मनोज बोरगावकर यांच्या 'नदीष्ट' या बहुर्चित कांदबरीला जळगाव येथील मानाचा स्व. दिवाकर चौधरी सर्वोत्कृष्ट कादंबरी लेखन पुरस्कार जाहिर झाला आहे. एकतीस हजार रूपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मनोज बोरगावकर हे वृत्तीने कवी आहेत. त्यांच्या 'कोरा कागद निळी शाई' हा काव्यसंग्रह राजहंस प्रकाशनाने यापूर्वी प्रकशित केला असून अनेक पुरस्कारांनी हा काव्यसंग्रह सन्मानित आहे.

'अकथ कहाणी सद्गुणांची' हा ललित लेख संग्रहसुद्धा मनोज बोरगावकर यांच्या नावे असून सायन प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केला आहे. 'नदीष्ट'ही ग्रंथाली प्रकाशनाची कादंबरी वाचकांनी उचलून धरली असून समाजमाध्यमांवर या कादंबरीवर मोठी चर्चा घडली आहे. अनेक वृत्तपत्रांमध्येही महत्त्वाच्या समीक्षकांनी या कादंबरीची समीक्षा केली आहे. या पुरस्कारानिमित्त मनोज बोरगावकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News