मंगलमूर्ती...

इंजि. निखिल कांबळे
Monday, 24 August 2020
  • गणव्यवस्थेचा अधिपती तो उपमा गणपती, का रे करता त्या महान तत्वाची विकृती

नुसतीच नाही ती मूर्ती अन आकृती,

जनकल्याण करी होती शाश्वती।

का रे करता त्या...

अमंगल परिवर्तित मंगल घडविती,

पदी त्या घेतली उदंड जगस्वीकृती,

शिक्षा, संप्रभुता, संपन्नता, सभ्यतेची संस्कृती,

दाही दिशा ज्याची ख्याती अन प्रचिती।

का रे करता त्या...

वज्राची मूठ असे राजपाट सन्मार्ग नीती

विघ्न कुठे न दिसे न भाकड कुरीती

समानतेची मेख जिथे मृगजळ मधुर प्रीती

सुख समृद्धी समाधानाची जळे लख्ख पणती।

का रे करता त्या...

विश्वाची ती सुव्यवस्था, बुद्धी चातुर्य उन्नती

नव्हत्या जाती नव्हते धर्म नव्हतीच अवनती

अखंड एकात्मता नांदली समस्त मानवाप्रति

चंद्र ही लाजे गुप्त असा मौर्या मंगलमूर्ती।

का रे करता त्या महान तत्वाची विकृती

गणव्यवस्थेचा अधिपती तो उपमा गणपती

 

महाराष्ट्र मुंबई

 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News