मनाची सुंदरता

स्वाती ठोंबरे
Saturday, 11 May 2019

राग लोभ मनात ठेवले की
वेदनाच साऱ्या मिळतात,
मनात ठेवलं काही की
शरीराला यातना त्या होतात...

मन किती सुंदर असतं
जाणिवेच्या पलीकडील
विचारांचं माध्यम असतं,
मनात प्रश्न सतत पडतात
आणि विचारांचं काहूर
हृदयात गर्दी करतात...

सोप्प असत दुसऱ्याच्या
मनात जागा अलवार करणं, 
त्यासाठी आपलं मन मोकळं
करणं गरजेचं अधिक असतं...

राग लोभ मनात ठेवले की
वेदनाच साऱ्या मिळतात,
मनात ठेवलं काही की
शरीराला यातना त्या होतात...

नकोच कटुता मनात आणि 
नकोच मनात वाईट आठवणी,
मन कस पाटी सारख ठेवा
चुकलं काही तर पुसून
जाईल क्षणात सगळं काही...

मन अलवार जपलं तर 
नाती आणि संबंध टिकतात,
कटुता मनातून विसरली की 
भावना सगळ्या सुंदर होतात...
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News