ममता बॅनर्जी या देशद्रोह्यांप्रमाणे वागत आहेत - जयप्रकाश मुजुमदार, 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019
  • नितीच्या बैठकीला ममतांची दांडी
  • बैठकीला उपस्थित राहण्यात काहीही अर्थ नाही - ममता बॅनर्जी

कलकता - राज्यांच्या नियोजन आराखड्यांना मदत करण्याचे अधिकार निती आयोगाला नाहीत, त्यामुळे या आयोगाच्या १५ जून रोजी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्यात काहीही अर्थ नाही, असे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. अशा प्रकारच्या ‘निष्फळ’ बैठकीला आपण उपस्थित राहणार नाही, असेही बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. 

निती आयोगाला कुठलेही अर्थविषयक अधिकार नाहीत. तसेच, राज्यांच्या नियोजन आराखड्याला मदत करण्याचाही अधिकार या आयोगाला नाही. त्यामुळे कुठलेही आर्थिक अधिकार नसलेल्या निती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहण्यात मला स्वारस्य नाही, असे बॅनर्जी यांनी पत्रात म्हटले आहे. 

सहकार्यात्मक संघराज्याची संकल्पना खोल रुजविण्यासाठी केंद्र सरकारने आपले लक्ष आंतरराज्य परिषदेवर (आयएससी) केंद्रित करण्याची आवश्‍यकता आहे, अशी सूचनाही बॅनर्जी यांनी पत्रात केली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. 

ममता बॅनर्जी या देशद्रोह्यांप्रमाणे वागत आहेत. त्यांचे वर्तन देशाच्या हिताच्या विरोधात आहे. पश्‍चिम बंगालच्या विकासाच्या मार्गात अडसर निर्माण करण्याचे काम त्या करत आहेत.
- जयप्रकाश मुजुमदार, 
प. बंगालचे भाजप नेते

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News