मल्लिका-तुषारची वेबएन्ट्री

यिनबझ ऑनलाईन टीम
Wednesday, 6 February 2019

 मल्लिका शेरावत खूप काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. तुषार कपूरही गोलमाल सीरिजमधूनच दिसत आहे; पण आता दोघेही डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहेत.

    ऑल्ट बालाजीवर सुरू होणाऱ्या ‘बू... सबकी फटेगी’ या हॉरर कॉमेडी वेबसीरिजमधून दोघे डिजिटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्री करणार आहेत. एक मित्रांचा ग्रुप एका भयावह रिसॉर्टमध्ये एक अख्खी रात्र काढण्याचा प्लॅन करतो. हे रिसॉर्ट एक आंधळा माणूस सांभाळत असतो.

हा ग्रुप त्या रिसॉर्टमध्ये घडणाऱ्या पॅरानॉर्मल घडामोडींकडे दुर्लक्ष करतो आणि हसीना नावाच्या भुताकडेही. मल्लिका शेरावत या भुताची भूमिका साकारत आहे.

एकेक करून हे मित्र मारले जातात आणि भूत बनून त्यांच्या मित्रांना मारत जातात, अशी या वेबसीरिजची एकूण कथा आहे.

तुषार कपूर आणि मल्लिका शेरावतबरोबरच किकू शारदा, संजय मिश्रा, कृष्णा अभिषेक या वेबसीरिजमध्ये दिसणार आहेत. ‘गोलमाल’फेम फरहा सामजी या वेबसीरिजचं दिग्दर्शन करणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News