मल्हारी देवदत्त नागे दिसणार 'डॉन'च्या भुमिकेत...

यिनबझ टीम
Monday, 3 February 2020

'जय मल्हार' मधून प्रेषकांच्या भेटीला आलेला रांगडा अभिनेता, देवदत्त नागे आता जबरी डॉन डॉक्टरच्या भुमिकेत दिसणार आहे. 'झी युवा' च्या येत्या नव्या मालिकेतून देवदत्त नव्या लुकमध्ये प्रेषकांच्या भेटीला येणार आहे. 'डॉक्टर डॉन' असं या मालिकेचे नाव असून येत्या १२ फेब्रुवारीपासून ही मालिका प्रेषकांच्या भेटीला येणार आहे.

'झी युवा' या वाहिनीसोबत काम करणे, ही माझ्यासारख्या अनेक कलाकारांसाठी आनंदाची गोष्ट असते. 'झी' वाहिनीवरील जय मल्हार मालिकेमुळेच मला प्रेषकांनी आपलसं केलं, त्यांमुळे मला प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे 'झी' सोबत असलेलं प्रत्येक कलाकाराचं नातं खूपच प्रेरणादायी असते. झीसोबतचे हे ऋणानुबंध माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, असे मत देवदत्त नागे यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले आहे.

या मालिकेत देवा, हा एक इंटरनॅशनल डॉनची भुमिका साकारताना दिसणार आहे. त्याच्याच जिवनावर ही मालिका आधारित असणार आहे. देवाची म्हणजेच डॉनची मुलगी एक मेडिकल स्टुडंट असते. तिला डॉनचं वागणं पटत नसते. ते सगळं सोडून डॉन आपल्या मुलीच्या सोबत राहाण्यासाठी कॉलेजमध्ये दाखल होतो.

डॉन जरी कामाने आणि नावाने असला तरी तो मनाने सच्चा आमि दिलखुलास असतो. तो लोकांना खूप मदत करत असतो, फक्त त्याची मदत करण्याची पध्दत फार वेगळी असते. तो समाजामध्ये कशाप्रकारे काम करतो, हे या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News