मलायका म्हणते, 'दबंग ३’ नकोच...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 19 July 2019
  • अभिनेत्री मलायका अरोराने अरबाज खानबरोबर ‘दबंग’ चित्रपटाच्या दोन्ही सीरिजची निर्मिती केली.
  • ‘दबंग ३’ चित्रपटाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर मलायका या चित्रपटाशी जोडली जाणार का, याची चाहत्यांना उत्सुकता होती. मात्र, मलायका म्हणते, ‘माझा ‘दबंग ३’शी काहीही संबंध नाही.

अभिनेत्री मलायका अरोराने अरबाज खानबरोबर ‘दबंग’ चित्रपटाच्या दोन्ही सीरिजची निर्मिती केली. शिवाय ‘दबंग’मधील तिचे ‘मुन्नी बदनाम हुई’ हे आयटम साँग जगप्रसिद्ध आहे.

‘दबंग ३’ चित्रपटाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर मलायका या चित्रपटाशी जोडली जाणार का, याची चाहत्यांना उत्सुकता होती. मात्र, मलायका म्हणते, ‘माझा ‘दबंग ३’शी काहीही संबंध नाही. या चित्रपटाशी जोडले गेलेले सारे कलाकार माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे गेले आहेत.

मी त्या सगळ्यांना ऑल द बेस्ट म्हणेन. माझ्याकडे सध्या उत्तम कथा आहेत. त्या मी लवकरच प्रेक्षकांसमोर आणेन. मी लघुपटदेखील बनवण्याच्या तयारीत आहे; मात्र त्याला अजून अवकाश आहे.’ 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News