मलई चिकन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 10 June 2020

हॉटेल सारखे मलई चिकन तुम्ही आता तुमच्या घरी सुध्दा करू शकतात. म्हणूनच बुधावर स्पेशल मलई चिकन रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे. 

हॉटेल सारखे मलई चिकन तुम्ही आता तुमच्या घरी सुध्दा करू शकतात. म्हणूनच बुधावर स्पेशल मलई चिकन रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे. 

साहित्य :-

• १/२ किलो चिकन
• १ कांदा बारीक चिरलेला
• १ कप फ्रेश क्रीम
• २ कप दुध 
• २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
• १ वेलची पावडर
• १ चमचा आलं बारीक केलेल
• कोथिंबीर बारीक चिरलेला
• १/२ चमचा आलं पावडर
• ३ चमचे व्हाईट पेपर पावडर
• १ चमचा कसुरी मेथी
• २ चमचे गरम मसाला
• १ चमचा आलं-लसूण पेस्ट
• केशर 
• बदाम बारीक कापलेले
• काजू बारीक कापलेले
• मीठ
• खडा मसाला
• २-३ वेलच्या 
• १ दालचिनी
• २-४ लवंगा
• २ चमचे जिरे
• ३-४ काळी मिरी
• १ जायपत्री

कृती :-

चिकनाच्या तुकड्यांना आलं-लसून पेस्ट, मीठ, व्हाईट पेपर पावडर चोळून १५-२० मिनिटे बाजूला ठेऊन द्या. खडा मसाला मिक्सर मध्ये वाटून घ्या. मध्य आचेवर कढई ठेवून त्यात कांदा, हिरव्या मिरच्या आणि क्रीम टाकून कांदा मऊ होईपर्यंत परतावे.

आता त्यात चिकन टाकून परतून घ्यावे. आता त्यात आले, आलं पावडर, कोथिंबीर, व्हाईट पेपर पावडर, कसुरी मेथी, गरम मसाला आणि केशर टाकावे. मध्यम आचेवर १० मिनिटे शिजवावे. वाटल्यास थोडे पाणी घालावे. कोथिंबीर, बदाम आणि काजूनी सजवावे. नान किंवा गरम भात बरोबर वाढावे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News