मकरंद देशपांडे आता छोट्या पडद्यावर परत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 8 January 2020

मकरंद आता छोट्या पडद्यावर परतत आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या शोच्या परीक्षकपदाची धुरा मकरंद सांभाळणार आहे.

मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमध्ये मोजक्‍याच; पण महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा कलाकार म्हणजे मकरंद देशपांडे. सतत काही ना काही नवं करू इच्छिणारा मकरंद आता छोट्या पडद्यावर परतत आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या शोच्या परीक्षकपदाची धुरा मकरंद सांभाळणार आहे. तरुण पिढीला आपली कला सादर करण्याची संधी या शोमधून मिळणार आहे. मकरंदही नव्या कलाकारांचा शोध घेण्यास सज्ज झाला आहे.

तो म्हणतो, ‘या शोने बरेच कलाकार घडवले. आता पुन्हा एकदा नवा शोध सुरू होणार आहे आणि स्पर्धा जितकी कठीण तितकीच मजेशीर असणार आहे. दिग्दर्शक संजय जाधवही या शोचे परीक्षक असणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News