तेलकट त्वचेसाठी  मेकअप करताना अशी घ्या काळजी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 18 March 2020
  • ऑफिस असो किंवा कोणता कार्यक्रम महिलांसाठी मेकअप हा महत्त्वाचा भाग असतो. इव्हेंटप्रमाणे कमी-जास्त प्रमाणात प्रत्येकजण मेकअप करत असतो.

ऑफिस असो किंवा कोणता कार्यक्रम महिलांसाठी मेकअप हा महत्त्वाचा भाग असतो. इव्हेंटप्रमाणे कमी-जास्त प्रमाणात प्रत्येकजण मेकअप करत असतो. कपड्यांसोबतच हलका मेकअप असेल तर व्यक्तिमत्त्व आणखी खुलून दिसतं. मात्र मेकअप करताना आपली त्वचा कोणत्या प्रकारची आहे, हे ओळखणं फार महत्त्वाचं आहे.

आपल्या त्वचेचा प्रकार समजल्यास आपल्याला त्याप्रमाणे मेकअप करणं सोयीस्कर जाते. अनेकांची त्वचा कोरडी असते, काहींची तेलकट असते, तर काही जणांची दोन्ही प्रकारात मोडते. यामध्ये तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींना मेकअप करताना अनेक अडचणी येतात. 

तेलकट असल्याने कोणता मेकअप किती काळ टिकेल याबाबत काळजी घेणे गरजेचं ठरतं. मेकअप करताना सुरुवातीला काही गोष्टींची काळजी घेतली तर तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींचा मेकअप देखील दीर्घकाळ टिकू शकतो. 

कोणत्याही प्रकारचा मेकअप करण्यापूर्वी आपला चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यावा. त्यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलकटपणा दूर होतो. 

तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी त्यानुसारच सौंदर्य प्रसाधनांची निवड करावी. 

त्वचेवरील तेल कमी होण्यासाठी क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चराइजिंग करणे आवश्यक आहे. 

चेहऱ्यावर ऑइल बेस्ड क्रीम लावायची असेल तर त्यापूर्वी वॉटर बेस्ड क्रीम लावावी, जेणेकरून त्वचेवरील तेलकटपणा बॅलेन्स होऊन मेकअप ऑयली दिसणार नाही. 

मेकअप करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फाउंडेशन..! तेलकट त्वचेसाठी फाउंडेशन निवडताना चेहऱ्याचा टोन पाहून निवडावे. त्यामध्ये मॉइश्चराइजर मिक्स करून घ्यावं, त्यानंतर किंचित ओलसर स्पंजच्या सहाय्याने चेहऱ्यावर लावावे. 

अनेकजण फाउंडेशन लावल्यावर कॉम्पॅक्ट पावडरचा वापर करत नाही, मात्र तेलकट त्वचा असणाऱ्यांनी कॉम्पॅक्ट पावडरचा वापर नक्की करावा. 

दरम्यान त्वचेवरील तेलकटपणा कमी करण्यासाठी काही घरगुती टिप्स देखील फायदेशीर ठरतात. 

दही-बेसनचा लेप लावल्याने चेहत्यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत मिळते.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News