आपल्या प्रेमाला करा "चॉकलेटी' 

मंगेश गोमासे
Saturday, 9 February 2019

नागपूर - प्रेमाच्या सप्तरंगी उत्सवातील आजचा दिवस चॉकलेटचा आहे. काल प्रपोज डे ला तुम्हाला तुमच्या जीवलगाचा होकार मिळाला असेल तर तुमचे अभिनंदन. आता तिला किंवा त्याला भेटायला बाहेर पडणार असाल तर सोबत एक मस्त चॉकलेट घेउन जा. कारण चॉकलेटने प्रेमाचा गोडवा अधिक वाटतो. चॉकलेटमधून तयार होणारी रसायने प्रेमाची वाट सोपी करतात. दोस्तहो, हे आमचे म्हणने नाही. अभ्यासाअंती सिद्ध झालेली ही गोष्ट, खास चॉकलेट डेच्या निमित्ताने आम्ही शेअर करत आहोत. 

नागपूर - प्रेमाच्या सप्तरंगी उत्सवातील आजचा दिवस चॉकलेटचा आहे. काल प्रपोज डे ला तुम्हाला तुमच्या जीवलगाचा होकार मिळाला असेल तर तुमचे अभिनंदन. आता तिला किंवा त्याला भेटायला बाहेर पडणार असाल तर सोबत एक मस्त चॉकलेट घेउन जा. कारण चॉकलेटने प्रेमाचा गोडवा अधिक वाटतो. चॉकलेटमधून तयार होणारी रसायने प्रेमाची वाट सोपी करतात. दोस्तहो, हे आमचे म्हणने नाही. अभ्यासाअंती सिद्ध झालेली ही गोष्ट, खास चॉकलेट डेच्या निमित्ताने आम्ही शेअर करत आहोत. 

चॉकलेट मधून निघणारी रसायणे सोपी करतात प्रेमाची वाट 
व्हॅलेटाईन वीक निमिंत्ताने चॉकलेटचा खूप प्रचंड वाढला आहे. चॉकलेटमुळे लठ्ठपणा वाढतो त्यामुळे डायटिंग करणारे लोक चॉकलेट खाणे टाळतात. मात्र चॉकलेटचे फायदेही बरेच आहेत. एका चॉकलेटमध्ये अनेक फायदेशीर तत्व आढळतात. प्रेमाच्या बाबतीत हे तर फारच फायदेशीर आहेत. चॉकलेट मनावरील नैराश्‍य दूर करते. चॉकलेटवर संशोधन करणा-या अमेरिकन केमिकल सोसायटीने असा रिपोर्ट दिलाय की, चॉकलेटमधून तयार होणारी रसायणे माणसाची दु:ख, ताण-तणाव, वैष्मय यासारख्या भावनांवर प्रभावकारी ठरतात. याशिवाय चॉकलेटमधील वॅ-फिन आणि थियोब्रोमिन शरिराला ऊर्जा पुरविते. 

ऍग्रिकल्चर ऍण्ड फूडवे मेस्ट्रीच्या रिपोर्टनुसार चॉकलेट शरिरात आवश्‍यक असणारे कोलेस्ट्रॉल निर्माण करू शकते. प्रेम या अडीच अक्षरामध्ये प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य समावलेले आहे. प्रेम असेल तर व्यक्ती परिपूर्ण होऊ शकत नाही. प्रत्येकाला कळत नकळत प्रेम होतेच. मग ते प्रमे एखाद्याच्या दिसण्यावर, हसण्यावर, डोळयावर बोलण्यावर किंवा चालण्यावर होत असते. अशा प्रेमात रूसवे, फुगवे असतातच कारण त्यानेच प्रेम वाढत जातं. ख-या प्रेमात जाती-पातीच्या बेड्या कधीच अडकत नाही, म्हणून म्हणतात की, प्रेम करावं भिल्लासारखं बानावरती खेचलेलं, मातीमध्ये उगवूनसुद्धा आभाळापर्यंत पोहचलेलं. 

कारण जमीन आणि आकाश यांच्यातले अंतर प्रेमानेच कापणे शक्‍य असते, म्हणून ते अंतर सर करण्यासाठी तारूण्यात पहिली नजर पहला प्यार होत असतो. अशा तारूण्याच्या धुंदीमध्ये जगत असताना प्रत्येकाला प्रियकर प्रेयसी असतेच, तीच आपली जीवाची सोबती असते. तिच्या प्रेमाच्या परीक्षेत पास होण्यासाठी आहोरात्र मेहनत घेतली जाते. तिच्या आवडी निवडी मुद्दाम लक्षात ठेवाव्या लागतात. यातील एक कॉमन आवड असते, ती म्हणजे चॉकलेटची आणि आजचा दिवस तर संपूर्णपणे चॉकलेटलाच वाहीलेला आहे. तेंव्हा घ्या हातात चॉलेटचा बार आणि उधळा प्रेम अपरंपार. 

डार्क चॉकलेट देते मन:शांती 
सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मनाला शांती कशी मिळावी या प्रश्नाने सर्वजण त्रस्त झाले आहेत. प्रार्थना, योग, ध्यानधारणा असे अनेक उपाय करून लोकांना शांती मिळत नाही; पण आता संशोधकांनी मन: शांतीसाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. डार्क चॉकलेटचा एक तुकडा तोंडात टाका अन्‌ तो चघळत राहा. त्यातून तुम्हाला मन:शांती मिंळेल. चितवृत्ती शांत होईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या व्यक्तीला देण्यासाठी चॉकलेट हा मस्त पर्याय आहे, डार्क चॉकलेटमध्ये पॉलिडेनॉल्स हा घटक आहे आणि त्या घटकामुळे मानसाला अतिउत्तेजीत करणा-या हार्मोन्सवर नियंत्रण मिळविता येते. परिणामी माणूस शांत होतो. एवढेच नव्हे तर माणसाचा तणाव देखील कमी होतो. 

चॉकलेट खा अन्‌ हसत रहा 
माणूस खुश झाला की, चॉकलेट देतो आणि चॉकलेट खाणारा खुश होतो. असे ब-याच दिवसापासून आढळलेले आहे; पण असे नेमके का होते. हे समजत नव्हते. एखादे लहान मूल रडायला लागले की, त्याला चॉकलेट देतात आणि चॉकलेट खाल्ले की ते मूल हसायला लागते. ऑस्ट्रेलीयातील स्विनबर्न युनिव्हसिटी ऍण्ड टेक्‍नॉलॉजी या विद्यापीठाच्या मॅथ्यू पेस या संशोधकांने चॉकलेट खाल्ले की माणूस हसतो. या प्रश्नाच्या अनुरोधाने संशोधन करायला सुरूवात केली आणि त्याला हे उत्तर मिळाले. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News