शेंगदाण्याच्या मदतीने करा वजन कमी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 4 October 2019

अलीकडच्या धावपळीच्या युगात वजन वाढू शकते,  वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधले जातात मात्र प्रत्येकाला रोजच्या धावपळी मध्ये ते उपाय फॉलो करणे जमत नाही. मात्र शेंगदाण्याचा  वापर हा आपण वजन कमी करण्यासाठी करू शकतो. 

अलीकडच्या धावपळीच्या युगात वजन वाढू शकते,  वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधले जातात मात्र प्रत्येकाला रोजच्या धावपळी मध्ये ते उपाय फॉलो करणे जमत नाही. मात्र शेंगदाण्याचा  वापर हा आपण वजन कमी करण्यासाठी करू शकतो. 

आपल्या निरोगी आणि फिट जीवनासाठी मेटाबॉलिज्म मजबूत असणं फार गरजेचं आहे. ज्या लोकांचं मेटाबॉलिज्म योग्यप्रकारे काम करतं, ते लोक निरोगी राहतात. असे लोक अनेक गंभीर आजारांपासूनही बचाव करू शकतात. मेटाबॉलिज्म योग्य राहिल्याने शरीरातील अवयवांमध्ये कार्बोहायड्रेट जमा होत नाही. कार्बोहायड्रेट किंवा फॅट जमा झाल्यानेच आपलं वजन वाढू लागतं. शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या शरीराचं मेटाबॉलिज्म चांगलं राहतं. शेंगदाणे कार्बोहायड्रेटचं सर्वात चांगला स्त्रोत आहे. 

शेंगदाणे खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं आणि भूकही लागत नाही. अशात जर तुम्ही शेंगदाण्याचं सेवन कराल तर तुमचं पोट भरलेलं राहणार आणि तुम्ही कोणतेही कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खाणार नाही. याने तुमचं वजन नियंत्रणात राहील. शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. तसेच शेंगदाण्यांमध्ये बायोटिन, तांबं, पोटॅशिअम, फोलेट, नियासिन, थियामिन आणि व्हिटॅमिन ई सारखे पोषक तत्वही असतात. हे तत्व शरीरात आढळणाऱ्या शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. 

व्हिटॅमिन ई सारखे पोषक तत्व असल्याने  शरीरात आढळणाऱ्या मोनोअनसॅच्युरेटेड फॅट कमी करण्यास मदत करतात. केवळ इतकंच नाही तर या पोषक तत्वाने कॅलरी बर्न होण्यासही मदत मिळते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी शेंगदाणे फायदेशीर ठरतात.मोनोअनसॅच्युरेटेड फॅट कमी करण्यास मदत करतात. केवळ इतकंच नाही तर या पोषक तत्वाने कॅलरी बर्न होण्यासही मदत मिळते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी शेंगदाणे फायदेशीर ठरतात.
 

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News