काळवंडलेली त्वचा गोरी करण्यासाठी 'हे' करा घरगुती उपाय

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Friday, 3 May 2019

घरात दैनंदिन वापरातील पालेभाज्या, फळे, दुग्ध पदार्थ यांचा उपायोग करुन काळी पडलेली त्वचा गोरी करा.

यंदाचा उन्हाळा अतिशय कडक आहे. उष्ण तापमाणाचे सर्व रेकॉर्ड ब्रेक झाले आहेत. उष्ण उन्हाळ्यात अनेक आजार होतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हामुळे त्वचा काळी पडते आणि काळी पडलेली त्वचा गोरी करण्यासाठी बाजारातील केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांचा वापर केला जातो. त्यामुळे त्वचा खराब होतो. घरात दैनंदिन वापरातील पालेभाज्या, फळे, दुग्ध पदार्थ यांचा उपायोग करुन काळी पडलेली त्वचा गोरी करु शकतो. जाणून घ्या हे आहेत घरगुती उपाय  

  • कच्चे दूध आणि लिंबाचा यांना एकत्र करुन त्याचा लेप तयार करावा. थोड्या वेळानी तो लोप काळ्या जागी लावावा. या यामुळे त्वचेचा काळेपणा निघून जाण्यास मदत होते. रोज लावाव. त्यामुळे काळी पडलेली त्वचा पुर्ववत होतो.
  • तोडाला पाणी सोडणारा संत्रा. संत्रासोलून घ्या. त्याची साल वाळवा. सालीचे पावडर करा. त्यात दही घालून मिश्रन बणवा तो लोप त्वचेवर लावा.  
  • लिंबू आणि साखर यांचे मिश्रणही काळवंडलेल्या त्वचेसाठी उपयुक्त ठरते. लिंबाच्या रसात साखर योग्य पद्धतीने विरघळून ते मिश्रण हात आणि पाय तसेच हाताचे कोपर, काळवंडलेली मान या ठिकाणी लावावे. चिकट असल्याने आपल्याला काही वेळ नकोसे होते पण थोडा वेळ ठेवून धुवून टाकावे. हे नियमित लावल्यास त्याचा चांगला फायदा होतो.
  • चंदन पावडर हे त्वचेसाठी रामबाण औषध आहे. पूर्वापार चालत आलेल्या या उपायाचा आजही तितकाच चांगला उपयोग होतो. चंदन पावडरमध्ये लिंबाचा रस आणि गुलाबपाणी घालून ते मिश्रण काळवंडलेल्या भागावर लावावे. चेहरा, हात, पाय अशा सगळ्या ठिकाणी १५ मिनिटांसाठी लावून ठेवल्यास त्वचेचा काळेपणा निघण्यास मदत होते.
  •  बेकिंग सोडा, लिंबू आणि नारळाचे तेल मिसळून तयार केलेली पेस्ट लावल्याने काळ्या मानेची समस्या दूर होईल. मात्र मानेवर किंवा त्याच्या जवळपासच्या त्वचेवर जखम असल्यास बेकिंग सोडा लावू नये. अन्यथा त्याचा त्रास होऊ शकतो. एका बाऊलमध्ये १ चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यात अर्था चमचा दही मिसळून पेस्ट तयार करा. दह्यात लॅक्टिक अॅसिड असतं, ज्याने त्वचा उजळण्यात मदत मिळते. दह्याऐवजी पाणीही वापरू शकता.
  • कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे विविध सौंदर्यप्रसाधनांमध्ये कोरफडीचा वापर केला जातो. काळवंडलेल्या त्वचेवर कोरफडीची जेल लावल्यास त्याचा त्वचा उजळण्यास निश्चितच फायदा होतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News