वर्तमानपत्रांचा वापर करून बनवा इकोफ्रेंडली मकर 

महेश सोरटे, ठाणे
Monday, 24 August 2020
  • आज गणेश चतुर्थी आपणास माहीतच आहे की, आपल्या सर्वांसमोर कोरोना महामारीच संकट आवासून उभं आहे त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार अनेक निर्बंध सध्या सार्वजनिक ठिकाणी लागू केले गेले आहेत.

आज गणेश चतुर्थी. आपणास माहीतच आहे की, आपल्या सर्वांसमोर कोरोना महामारीच संकट आवासून उभं आहे त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार अनेक निर्बंध सध्या सार्वजनिक ठिकाणी लागू केले गेले आहेत. त्यामुळे घरी आणलेल्या बाप्पाच्या मखराचे डेकोरेशन करायचे म्हंटले तर त्यासाठी लागणारे सामान काही ठिकाणी मिळते तर काही ठिकाणी नाही. तसेच सध्या रेडिमेड सजावटीसाठी लागणाऱ्या सामानाच्या किंमती देखील खूप महागल्या आहेत.  

त्यामुळे गणपती आणायचा आणि त्याचे विसर्जन करायचे. कशाला ती महागडी सजावट?, कोण पाहायला येणार आहे? अशी भावना सध्या लोकांमध्ये पाहावयास मिळते. मी या गोष्टीकडे थोड्या वेगळ्या दृष्टीने पहातो. मुळात असा विचार करणाऱ्या लोकांना मी सांगू इच्छितो की, आपण आपल्या घरात गणपती आणतो व त्यासाठी सजावट करतो ती लोकांसाठी नाही तर आपल्यासाठी, आपल्या आनंदासाठी, समाधानासाठी  हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. आपण सर्वांनी कोरोनाला न घाबरता परंतु शासकीय नियमांचे पालन करून आपापल्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे उत्साहाने,  आनंदाने आणि भक्तिभावाने गणेश उत्सव साजरा करायला हवा. 

आज आमच्या मयेकर कुटुंबीयांनी आणि मित्र परिवाराने टाकाऊ वस्तूंपासून आपल्या लाडक्या बाप्पाकरीता  सुंदर मकर बनवला आहे. यासाठी आम्ही घरी उपलब्ध असणाऱ्या वर्तमान पात्रांचा वापर केला. वर्तमानपत्र आपल्यापैकी सर्वांच्याच घरी येत असावेत त्यामुळे ही वर्तमानपत्रे आपण रद्दीत देण्यापेक्षा त्याचा वापर मकर तयार करण्यासाठी केला तर किती छान.   

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News