आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षेत मोठा बदल; वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 4 July 2020

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी परीक्षांचे वेळापत्रक 45 दिवस अगोदर जाहीर करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाला दिले होते. त्यानुसार उन्हाळी सत्रातील परीक्षा टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत.

मुंबई : कोरोनामुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या परीक्षा 4 ऑगस्टपासून सुरू होणार असून, अंतिम वर्षाच्या वेळापत्रकात एक दिवसाचा खंड देण्यात आला आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी परीक्षांचे वेळापत्रक 45 दिवस अगोदर जाहीर करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाला दिले होते. त्यानुसार उन्हाळी सत्रातील परीक्षा टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

उन्हाळी सत्रातील पदवीपूर्व अंतिम वर्ष अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक 5 जूनला जाहीर करण्यात आले होते. या वेळापत्रकात एक दिवसाचा खंड देण्यात आला नव्हता. मंत्र्यांच्या आदेशानुसार पदवीपूर्व अंतिम वर्षाच्या वेळापत्रकात एक दिवसाचा खंड देण्यात आला आहे. परीक्षा 16 जुलैऐवजी 4 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली.
ऍलोपॅथी अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे वेळापत्रक वगळता अन्य सर्व अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दंत, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, फिजिओथेरपी, ऑक्‍युपेशनल थेरपी, नर्सिंग, स्पीच लॅंग्वेज पॅथॉलॉजी अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा 18 ऑगस्टपासून सुरू होतील. लेखी परीक्षा झाल्यानंतर तातडीने प्रक्‍टिकल परीक्षा घेण्यात येणार आहेत.

या परीक्षा 18 ऑगस्टपासून

बी.एस्सी. इन पॅरामेडिकल टेक्‍नोलॉजी, डिप्लोमा इन पॅरामेडिकल टेक्‍नोलॉजी, मास्टर इन पब्लिक हेल्थ न्युट्रीशन, एम.बी.ए. (हेल्थ केअर ऍडमिनिस्ट्रेशन), एम.एस्सी. (फार्मा. मेडिसिन), पी.जी. डी.एम.एल.टी., बॅचलर इन ऑप्टोमेट्री, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री, डिप्लोमा इन ऑप्थॅलमिक, सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी या अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा 18 ऑगस्टपासून घेण्यात येणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News