एमबीए प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल; अंतिम वर्षाच्या गुणावर मिळणार थेट प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 August 2020

एमबीएस सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन महाविद्यालयात रिक्त असणाऱ्या जागेवर, अंतिम वर्षाच्या मार्कानसुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे द्यावे, असे आदेश भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे संचालक प्राध्यापक अनिल सहस्त्रबुद्धे यांनी महाविद्यालयांना दिले.

मुंबई : एमबीए करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेणे एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. अंतिम वर्षाच्या गुणांवर विद्यार्थ्यांना थेट एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे एमबीएच्या प्रवेश परीक्षेत बदल करण्यात आल्याची माहिती तंत्रशिक्षण परिषदेने दिली. 

देशात एमबीए प्रवेशासाठी विविध प्रकारच्या पाच पूर्वपरीक्षा घेतल्या जातात. या पूर्व परीक्षा सात राज्यकडून आयोजिक केल्या जातात. या परीक्षेत उत्तम मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. मात्र यंदा संपुर्ण देशात कोरोनाचे गंभीर सावट पसले आहे. अशा परिस्थिती अनेक विद्यार्थ्यांना एमबीएसची प्रवेश पुर्व परीक्षा देता आली नाही, ज्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची नवीन नियमावली जाहीर करण्यात आली. यंदा एमबीएस पुर्व परीक्षा आयोजित केली होती, ही परीक्षा एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांनी दिली, त्यातून फक्त ५७ हजार विद्यार्थ्यांना 100 पेक्षा अधिक मार्क मिळाले आहेत. या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सात सप्टेंबरला सुरू होणार आहे. 

एमबीएस सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन महाविद्यालयात रिक्त असणाऱ्या जागेवर, अंतिम वर्षाच्या मार्कानसुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे द्यावे, असे आदेश भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे संचालक प्राध्यापक अनिल सहस्त्रबुद्धे यांनी महाविद्यालयांना दिले. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना एमबीएला प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांशी संपर्क करण्याचे आवाहन परिषदेकडून करण्यात आले.

चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थी पुन्हा सीईटी परीक्षेला बसतात, त्यामुळे महाविद्यालयाच्या अनेक जागा रिक्त होतात. अशा जागांवर अंतिम वर्षाच्या मार्कानुसार विद्यार्थ्यांना प्रेवश मिळणार आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना एमबीएस सीईटी परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाले असे विद्यार्थी एमबीए प्रवेशासाठी अर्ज करतील असा प्रश्न शिक्षण संस्थेने उपस्थित केली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News