"माझा होशील ना.." या मालिकेतील नायक आहे मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 February 2020

या नव्या मालिकेत विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे हे मुख्य भूमिकेत आहेत. विराजस हा खूप चांगला लेखक तसेच दिगदर्शक देखील आहे. यापूर्वी त्याने हॉस्टेल डेस या चित्रपटात काम केले होते.

लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका "स्वराज्य रक्षक संभाजी" ही मालिका अखेरच्या टप्प्यात सुरु आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्या जागी नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. "माझा होशील ना?" असं या नव्या मालिकेचं नाव असून त्याचे प्रोमो देखील सुरु झाले आहेत. प्रोमो पाहून प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

या नव्या मालिकेत विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे हे मुख्य भूमिकेत आहेत. विराजस हा खूप चांगला लेखक तसेच दिगदर्शक देखील आहे. यापूर्वी त्याने हॉस्टेल डेस या चित्रपटात काम केले होते. विराजसबाबत एक आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हीच मुलगा आहे. तर गौतमी देशपांडे ही अभिनेत्री मृणाल देशपांडे हिची बहीण आहे. गौतमी हिने देखील यापूर्वी सोनी मराठी चॅनेलवरील सारे तुझ्याचसाठी मध्ये काम केले आहे. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Madhuri Premiere Mumbai Styled by @fragrance_designs Pic by @shruu_t

A post shared by Virajas Kulkarni (@virajas13) on

दरम्यान या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेत विराजस आणि गौतमीसोबतच विनय येडेकर, निखिल रत्नपारखी, सुनील तावडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तो पाहून प्रेक्षक देखील मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News