किनवट-माहूर विधानसभेच्या मैदानात महायुतीचे हे उमेदवार उतरण्यास इच्छुक

जयकुमार अडकिने
Monday, 3 June 2019
  • भाजपा आणि शिवसेनेचे अर्धा डजन  उमेदवार विधानसभा निवणुकीच्या तयारीत
  • हेमंत पाटील निवडून आले हे सांगण्यासाठी सेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सध्या स्पर्धाच सुरू झाली
  • गल्लोगल्ली या इच्छुक आमदारांचे पोस्टर्स, बॅनर्स लागल्याने शहराचेही विद्रुपीकरण झाले आहे.

माहूर: लोकसभेच्या निवडणुकीत हेमंत पाटलांना मिळालेले मताधिक्य हे आपल्याला आमदार बनवू शकते, या गोड गैरसमजापोटी भाजपा आणि शिवसेनेचे अर्धा डजन विधानसभा इच्छुक उमेदवार निवणुकीच्या तयारीला लागले आहेत. उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशी अवस्था झाली आहे.

हिंगोली लोकसभा मतदार संघात, सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या विधानसभा मतदारसंघात ४० हजार पेक्षा अधिक मताने हेमंत पाटील यांना मिळाली. ही मते आमच्या मुळे मिळाली या अविर्भावात शिवसेनेचे दोन तर भाजपाचे पाच असे एकूण सात उमेदवार विधानसभेच्या मैदानात उतरण्यास तयार आहे.
                
लोकसभा निवडणुकीत सहा विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या हेमंत पाटील यांना मोठे मताधिक्य मिळाल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी एकदमच वाढली आहे. आपल्यामुळे हेमंत पाटील निवडून आले हे सांगण्यासाठी सेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सध्या स्पर्धाच सुरू झाली आहे. स्थानिक नेत्यांच्या शक्तिप्रदर्शनामुळे नेत्यांची डोकेदु:खी वाढली आहे. विशेष म्हणजे गल्लोगल्ली या इच्छुक आमदारांचे पोस्टर्स, बॅनर्स लागल्याने शहराचेही विद्रुपीकरण झाले आहे.

लोकसभा निवडणूक अनेकांची नरेंद्र मोदी यांच्या नावावर जिंकली. प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना अहवान करत आपल पाहिलं मत पुलवामातील शहीद जवानांच्या नावे राष्ट्रभक्तीला समर्पित करा असे भावनिक आवाहन केले होते, लोकसभा निवडणूक भाजपाच्या कमळ निशाणी पेक्षा मोदी लाट देशात येऊन न भूतो न भविष्यती असे यश उमेदवारांना आले. हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील ही याला अपवाद नसून त्यांचा सुद्धा दोन लक्ष 75 हजार मतांनी विक्रमी विजय झाला. हा विजय आपण दिलेल्या मताधिक्यामुळेच झाला असे समजून काही युतीचे इच्छुक उमेदवार आमदारकीचे दिवास्वप्न पहायला लागले आहेत.

मोदी लाटेवर स्वार होण्यासाठी अनेक जण उमेदवारीसाठी सज्ज झाले आहेत. त्यात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, महसूल मंत्री यांचे मेव्हणे असलेले सचिन नाईक, भाजपचे धरमसिंग राठोड, संध्याताई राठोड, शरद राठोड, सुमित राठोड, यादव जाधव, अॅड. रमण जायभाये, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित असलेले मराठानेते अशोक पाटील सूर्यवंशी हे देखील प्रबळ दावेदार आहेत.

सेना भाजपाचे अनेक नेते व कार्यकर्ते आमदारकीसाठी गुडघ्याला आतापासूनच बाशिंग बांधून बसले आहे. त्यामुळे या इच्छुकांमध्ये खासदारांना शुभेच्छा देण्यासाठी स्पर्धा लागली आहे, आपल्या प्रयत्नांमुळे हेमंत पाटील यांना मते मिळाली याचा प्रचार या इच्छुकांनी सुरू केला आहे. इच्छुकांनी स्वत:ला आतापासून आमदार संबोधन्यास सुरुवात केली असल्याने ऐन वेळेवर मतदार संघ सेनेच्या वाटेला जातो की भाजपा कडेच राहतो या निर्णया नंतर एकालाच उमेदवारी मिळणार असून दुखावलेल्या ६ आत्म्या कडून एकोप्याने काम करून युतीचा उमेदवार निवडून अनण्यासाठी प्रयत्न केले जातील, की नेहमी प्रमाणे भाजपचे तीन गट पुन्हा विविध दिशेने सक्रिय होतील हे येणारा काळच ठरविणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News