महाराष्ट्र शिकावू योजना 10 लाख तरुणांना देणार रोजगार; पाहा कशी आहे प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 6 March 2020

योजना कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी 10 लाख रोजगार निर्मिती होईल असा विश्वास पवार यांनी विधानसभेत व्यक्त केला.

मुबई: राज्यात नोकर भरती बंद झाल्यामुळे लाखो तरुण बेरोजगार झाले, बेरोजगारांच्या हाताला रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी 'महाराष्ट्र शिकावु योजने'ची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या पहिल्या अर्थसंकल्पात केली. 1961च्या शिकावू उमेदवार अधिनियमानुसार 'महाराष्ट्र शिकावु योजना' सुरु करण्यात येणार आहे. योजना कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी 10 लाख रोजगार निर्मिती होईल असा विश्वास पवार यांनी विधानसभेत व्यक्त केला.

ज्या कौशल्याची जगात अधिक मागणी आहे ते कौशल्य तरुणांमध्ये निर्माण करणे आणि बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शिकावू योजना सुरु करण्यात येणार आहे. प्रथम ही योजना 5 वर्षासाठी असणार आहे. दहावी पास झालेल्या बेरोजगार तरुणांना प्रशिक्षणार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेता येईल. लाभार्थीचे वय 21 ते 28 दरम्यान असावे. प्रवेश घतलेल्या प्रशिक्षणार्थिंना 100 टक्के विद्यावेत दिले जाईल. योजनेसाठी स्वतंत्र संकेत स्थळाची निर्मिती करण्यात येणार आहे. 

प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना प्रशिक्षण खर्चाच्या 75 टक्के किंवा 5 हजार रुपये यातील जी रक्कम कमी आहे ती देण्यात येईल. या योजनेसाठी सरकारने 6 हजार कोटी रुपयांची तरतूत केली आहे. ही योजना 15 ऑगस्ट 2020 पासून सुरु होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News