महाराष्ट्राला वीज मोफत मिळणार ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 February 2020

दिल्ली दरबाराच्या योजना आपल्या दरबारी आणायचा मानस महाविकास आघाडीने घेतलेला दिसतो आहे. दिल्लीमध्ये निवडणूक लागल्या होत्या. या कालावधीत केजरीवाल यांनी निवडणुकीच्या तोंडावरच प्रतिमहिना २०० युनिट वीज मोफत देण्याचा संकल्प मांडला होता.

मुंबई : दिल्ली दरबाराच्या योजना आपल्या दरबारी आणायचा मानस महाविकास आघाडीने घेतलेला दिसतो आहे. दिल्लीमध्ये निवडणूक लागल्या होत्या. या कालावधीत केजरीवाल यांनी निवडणुकीच्या तोंडावरच प्रतिमहिना २०० युनिट वीज मोफत देण्याचा संकल्प मांडला होता. याचबरोबर २०१ ते ४०० युनिटपर्यँत वापर असलेल्या वीज ग्राहकांना वीजदारात ५० टक्के सूट देईन असेही केजरीवाल म्हणाले आहेत. 

हा किक्ता महाराष्ट्रातही राबवायचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. दरमहा १०० युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज देण्याचा विचार सुरु आहे. याबाबतची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे, त्याचबरोबर याबाबतचा आराखडा तयार करण्याच्या सूचना देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

याबरोबर २०० युनिटपर्यंत बीज वापरणाऱ्यांना मोफत वीज देण्याची चाचपणी केली जात आहे, मात्र पहिल्या टप्पात  १०० युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाणार आहे. यासाठी मोठी आर्थिक तरतूद असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सरकारच्या महावितरण आणि बाकीच्या तीन कंपन्यांना वीज दारात कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News