महाराष्ट्र दिन: गौरव गीत

वैभव दातार
Wednesday, 1 May 2019

आज १ मे महाराष्ट्र दिन. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील रत्नांचा उल्लेख असलेले छोटे काव्य ओवीबद्ध रुपात मी लिहिले आहे.

महाराष्ट्र माझा । आणि मी हो त्याचा |
दिन स्थापनेचा । आज एक मे ||१||

मराठी भाषिक | आनंदे राहती |
यत्ने घडविती | बहुरंगी ||२ ||

कवी अन् लेखक | वाग्देवीचे हार |
मिळे पुरस्कार |ज्ञानपीठ ||३ ||

क्रीडाक्षेत्री असे | नाव जे महान |
क्रिकेट सचिन | तेंडुलकर ||४||

विज्ञानयुगात | शास्त्रज्ञ ज्येष्ठ |
नाव बहु श्रेष्ठ | नारळीकर ||५||

लतादीदी नाव | रत्न भारताचे 
स्वर कोकीळेचे | दुमदुमती ||६||

स्वातंत्र्याचा लढा | संघर्षाचा काळ |
सावरकर बाळ | टिळकांचा ||७||

विदेशी शिक्षण |डॉक्टर महिला |
वंद्य भारताला | आनंदी जोशी ||८||

सह्याद्रीचा कडा | दुर्गम गडकिल्ले |
सतत रक्षिले | राज्यासी ह्या ||९||

शिवबा भगवा | झेंडा फडकवी |
स्वराज्य हिंदवी | स्थापियेले ||१ ०||

महाराष्ट्र दिन | चिरायू होवो |
जगद्वंद्य राहो | राज्य माझे ||१ १||

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News