महाराष्ट्र कोचिंग क्‍लासेस मालक संघटनेची सरकारकडे ‘ही’ मागणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 21 July 2020
  • राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून खासगी कोचिंग क्‍लासेस बंद आहेत. त्यामुळे क्‍लासेस मालकांचे मोठे नुकसान झाले आहे.
  • खासगी कोचिंग क्‍लासेसमधील १५ लाख कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेसाठी राज्य सरकारने ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील क्‍लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र कोचिंग क्‍लास मालक संघटनेचे अध्यक्ष सचिन कर्नावत यांनी केली आहे.

मुंबई :- राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून खासगी कोचिंग क्‍लासेस बंद आहेत. त्यामुळे क्‍लासेस मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. खासगी कोचिंग क्‍लासेसमधील १५ लाख कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेसाठी राज्य सरकारने ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील क्‍लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र कोचिंग क्‍लास मालक संघटनेचे अध्यक्ष सचिन कर्नावत यांनी केली आहे. त्याचप्रमाणे, खासगी कोचिंग क्‍लासेसकडून कमी जीएसटी कर आकारण्याची मागणीदेखील त्यांनी केली.

राज्यात जवळपास ९८ हजार कोचिंग क्‍लासेस आहेत. त्यामध्ये १ कोटी ४ लाख विद्यार्थी शिकत असून १५ लाख कर्मचारी काम करत आहेत. मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सर्व कोचिंग क्‍लासेस बंद झाले. तेव्हापासून आतापर्यंत आम्हाला काही कर्मचाऱ्यांना पगार द्यावा लागत असून मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. एप्रिल ते जून महिन्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी क्‍लासेसमध्ये प्रवेश घेतात. मात्र कोरोनामुळे यंदा कमी प्रवेश झाले आहेत, असे कर्णावत यांनी सांगितले.

सरकारचा प्रतिसादच नाही

क्‍लासेस चालू करायचे आहे की नाही? अभ्यासक्रम किती कमी होणार आहे? असे अनेक प्रश्‍न राज्य सरकारला विचारण्यात येत आहेत, आम्ही सुरक्षेची सर्व काळजी घेऊन क्‍लासेस सुरू करण्यास तयार आहोत. मात्र, सरकारकडून कोणताही प्रतिसाद आम्हाला मिळत नाही. क्‍लासेस सुरू न झाल्यास क्‍लासचालक-मालक यांचे जगणे कठीण होणार असल्याचे कोंचिग क्‍लास मालक संघटनेचे अध्यक्ष सचिन कर्नावत यांनी म्हटले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News