#महाराष्ट्र बजेट : शाळा आणि महाविद्यालयाबाबत मोठे निर्णय! 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 6 March 2020
  • आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केले आहे.
  • या अर्थसंकल्पात महाविकास आघाडीने सरकारने तरूण हाच केंद्रबिंदू ठेवल्याचे दिसून येत आहे.
  • हा अर्थसंकल्प ग्रामीण आणि शहरी भागाला समतोल राखणार आहे.
  • मात्र शाळा आणि महाविद्यालयाबाबत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. 

मुंबई:- आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केले आहे. महाविकास आघाडीचे हे पहिले अर्थसंकल्प सादर केले आहे. अर्थसंकल्प सादक करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून, वंदन करुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास विधानसभेत प्रवेश केला. अर्थसंकल्पात त्यांनी शैक्षणिक विभाग, रोजगार, शेतकरी, उद्योग यासाठी निरनिराळ्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात महाविकास आघाडीने सरकारने तरूण हाच केंद्रबिंदू ठेवल्याचे दिसून येत आहे. हा अर्थसंकल्प ग्रामीण आणि शहरी भागाला समतोल राखणार आहे. मात्र शाळा आणि महाविद्यालयाबाबत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. 

महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात महत्त्वाचा एक निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळा आदर्श शाळा म्हणून निर्माण करण्याचा मानस केला आहे, एवढेच नाही तर सर्व शाळांना इंटनेटच्या जाळ्याने जोडण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

यासोबतच महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील मराठी शाळा संदर्भात वाद सुरू आहेत. त्यावर महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मराठी शाळा नेटाने चालवणाऱ्यांच्या मागे उभे राहणे कर्तव्य करणार आहे. 

महाराष्ट्रातील वाढत्या बेरोजगारीमुळे राज्यातील 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांना कौशल्यपूर्ण किंवा कुशल काम करण्यासाठी प्रशिक्षण देणे ही आता सध्याची महत्त्वाची गरज आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थायाचा देखील या अर्थसंकल्पात विचार केला दिसून येतो आहे. डॉक्टरांची कमी भरुन काढण्यासाठी सध्याच्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या जागा वाढवून नवीन महाविद्यालये सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी सरकारने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरकारने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वाढ करण्यासाठी 2500 कोटी रूपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News