महाजॉब्स पोर्टल : १६०० पेक्षा अधिक उद्योगांना कामगारांची आवश्यकता

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 July 2020

आतापर्यंत २ लाख १६ हजार ८०७ नागरिकांनी नोकरीसाठी नाव नोंदणी केली आहे. तर १ हजार ६६१ उद्योगांनी रोजगार देण्यासाठी नोंदणी केली आहे. राज्यातील १६०० पेक्षा अधिक उद्योगांना कामगारांची आवश्यकता आहे.

मुंबई : बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने महाजॉब्स पोर्टल विकसीत केले. या पोर्टलला तरुणाईचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत २ लाख १६ हजार ८०७ नागरिकांनी नोकरीसाठी नाव नोंदणी केली आहे. तर १ हजार ६६१ उद्योगांनी रोजगार देण्यासाठी नोंदणी केली आहे. राज्यातील १६०० पेक्षा अधिक उद्योगांना कामगारांची आवश्यकता आहे, त्यासाठी स्थानिक मजूरांना प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योग विभागाने दिली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन सुरु केले. त्यामुळे राज्यातील बहुतांश कंपन्या, व्यवसाय बंद झाले. कंपन्यात काम करणारे लाखो मजूर बेरोजगार झाले. लॉकडाऊन काळात काम उपलब्ध नसल्यामुळे राज्यातील लाखो परप्रांतीय स्वगृही निघून घेले. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहेत, असा गंभीर परिस्थितीत परप्रांतीय कामगार राज्यात परत येणे शक्य नाही. त्यामुळे स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य देण्यात येत आहे. ही राज्यातील कामगारांसाठी आनंदाची बाब आहे.

राज्याची आर्थिक घडी बसवण्यासाठी सरकारने सशर्त व्यवसाय, उद्योग सुरु करण्याची परवानगी दिली, त्यामुळे कंपन्यांची चाके पुन्हा फिरु लागली. मात्र कंपन्यात काम करणारे लाखो प्ररप्रांतीय मजूर स्वगृही गेल्यामुळे उद्योगांना कामगारांची कमतरता जाणवू लागली, ही कमतरता भरुन काढण्यासाठी स्थानिक मजूरांना प्राधान्य देण्यात आले. उद्योगांना कामगारांची आवश्यकता आहे आणि बेरोजगारांना कामाची गरज आहे.  या दोघांना एका प्लॉटफार्मवर आणण्यासाठी महाजॉब्स पोर्टल विसकीत करण्यात आले. 

राज्यातील बेरोगार तरुणांनी महाजॉब्स पोर्टलवर नोंदणी करताना संपुर्ण माहिती भरावी. नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, शैक्षणिक प्रमाणपत्र, अनुभव, कौशल्य, रहिवाशी प्रमाणपत्र इत्यादी सर्व माहिती भरुन अर्ज सबमीट करावा. त्यामुळे उद्योजकांना आवश्यक असणारे कौशल्य प्राप्त उमेदवारांची निवड करताना सोयीस्कर जाईल असे मत एमआयडीसीचे सीईओ पी. अनबलगन यांनी व्यक्त केले.    

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News