महादेव जानकर यांनी धनगर समाजाचा विश्वास घात केला - प्रा. लक्ष्मण हाके 

प्रा. लक्ष्मण हाके 
Wednesday, 4 March 2020

महाराष्ट्रातील धनगर समाजातील बहुसंख्य तरुणांना रासप हा पक्षआपल्याला न्याय देईल अशी अपेक्षा होती, म्हणून गेली सोळा वर्षे समाजातील हजारो तरुणांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून या पक्षात उडी घेतली, हा पक्ष वाढवला पण महादेव जानकर यांनी या आशा-आकांक्षा धुळीस मिळवल्या, भाजप तर्फे विधानपरिषदेवर ज्या दिवशी ते गेले त्या दिवसापासून ते भाजपचे झाले, स्वतःची वेगळी ओळख हरवून बसले, रासपचे विचार विसरले, समाजाला वाऱ्यावर सोडले. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना महायुती मधील घटक पक्ष आणि नेता म्हणून त्यांची उंची वाढवण्याचे काम केले.

परंतु महादेव जानकर यांना नेता बनवले. महादेव जानकर भाजपचे कार्यकर्ता झाले, सत्तेत सहभागी झाल्यानंतर समाजाच्या प्रश्नाकडे ते लक्ष वेधून घेतील अशी अपेक्षा होती, पण त्यांनी मंत्री पदाचा सर्वात जास्त वेळ प्रवासात घालवला, दिल्ली बेंगलोर करीत राहिले, पक्ष खिळखिळा झाला, समाजाच्या महत्वाच्या प्रश्नावर भाजपला साजेल अशी "अळी मिळी गुप चिळी"अशी भूमिका त्यांनी घेतली. 

आज सत्ता गेल्यावर वरिष्ठ सभागृहात प्रश्न उपस्थित करताना दिसले," बैल गेला झोपा केला"अशी त्यांची अवस्था झाली आहे, केविलवाणी धडपड पाहून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या हाच का तो महादेव जानकर अशी म्हणायची वेळ आली आहे. शिव सेना सोडल्यास सर्वच पक्षांनी धनगर समाजाचा मतासाठी वापर केला आहे, हे धनगरसमाजाच्या तरुणांना कळून चुकले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News