महापोर्टल बंदच! हा नवा पर्याय होणार सुरू

यिनबझ टीम
Monday, 2 December 2019

महापोर्टलबाबात अनेक तक्रारी आणि त्याच्यात काही त्रुटी असल्याने हे पोर्टल बंद करून त्याच्याजागी नव सुधारीत पोर्टल सुरू करावे तोपर्यंत जुण्या पध्दतीने लेखी परिक्षा घ्याव्यात अशी मागणीही खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रस्तावाद्वारे केली आहे.

मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात नोकर भरती सुलभ व्हावी, यासाठी महापोर्टलची निर्मीती करण्यात आली होती, मात्र त्याच्या अनेक तक्रारींमुळे यावर बंदी घालण्यासाठी अनेक तरुणांनी आवाज उठवला होता, त्यालाच पाठिंबा देत सुप्रिया सुळे यांनी महापोर्टल बंद करण्यासाठीचा प्रस्ताव नवमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सादर केला.

महापोर्टलबाबात अनेक तक्रारी आणि त्याच्यात काही त्रुटी असल्याने हे पोर्टल बंद करून त्याच्याजागी नव सुधारीत पोर्टल सुरू करावे तोपर्यंत जुण्या पध्दतीने लेखी परिक्षा घ्याव्यात अशी मागणीही खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रस्तावाद्वारे केली आहे.

प्रशासकीय सेवेसाठी जाणाऱ्या तसेच स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या राज्यात मोठ्याप्रमाणात आहे, पण महापोर्टलमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने दुसरं नवीन आणि सुधारित पोर्टल सेवा सुरू करावी आणि तोपर्यंत लेखी परीक्षेच्या माध्यमातून तरुणांना संधी द्यावी, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News