मॅड मॅन

नितीन श्रोत्री
Thursday, 15 October 2020

असं काय आहे या माणसात? सहावीत असताना दृष्टी नाही म्हणून शाळेतून काढला गेलेला हा विद्यार्थी नंतर पंचेचाळीस किलोमीटर सायकलवरून ट्रिप करून कायमचा आत्मविश्वास मिळवतो काय, त्याची मधाळ वाणी आणि सेलिंग स्किल्स वापरून मेणबत्त्या बनवण्याच्या ट्रेनरकडून मसाजची लाच देऊन ते स्किल शिकतो काय... सगळंच अजब आहे!

मॅड मॅन

होय मॅड मॅन! हा माणूस खरंच वेडा आहे. त्याच्या ध्येयांबाबत, स्वप्नांबाबत आणि जे काही करतो त्या सगळ्याच बाबतीत. भावेश भाटिया या अवलिया उद्योजकाचं मनोगत ऐकल्यापासून मी अक्षरशः अवाक झालोय. कसं रिऍक्ट व्हावं तेच कळत नाहीये. ऑलरेडी दोन तीन वेळा रेकॉर्ड केलेलं भाषण स्वतः आणि कुटुंबियांना ऐकवून झालंय.

असं काय आहे या माणसात? सहावीत असताना दृष्टी नाही म्हणून शाळेतून काढला गेलेला हा विद्यार्थी नंतर पंचेचाळीस किलोमीटर सायकलवरून ट्रिप करून कायमचा आत्मविश्वास मिळवतो काय, त्याची मधाळ वाणी आणि सेलिंग स्किल्स वापरून मेणबत्त्या बनवण्याच्या ट्रेनरकडून मसाजची लाच देऊन ते स्किल शिकतो काय... सगळंच अजब आहे!

पुढं त्यानं महाबळेश्वरला परतल्यावर मसाज करून पाच हजार रुपये साठवून वीस किलो मेण विकत घेऊन ठरवल्याप्रमाणे मेणबत्त्या बनवायला सुरुवात केली. चहाची टपरी चालवणाऱ्या मित्राला दिवसाकाठी पन्नास रुपये देऊन त्याच्या हातगाडीवर न्यायची आणि आणायची सोय करून महाबळेश्वरला मेणबत्त्या विकायला सुरुवात केली. पुढं काही काळ गेल्यावर एक तरुणी त्यांना काही दिवस मेणबत्त्या बनवणं शिकण्यासाठी भेटली आणि त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्या प्रेमात पडली. त्यांना तिने तसं सांगितल्यावर त्यांचा जे काही ऐकलं त्यावर विश्वास बसला नाही. तिचे नातेवाईक आणि घरातील मंडळी यांनी भरपूर विरोध करूनही तिने त्यांच्याशी लग्न करण्याचा निश्चय केला होता. त्यांच्या रिसेप्शनला आलेल्या मंडळींनी भरपूर कानपिचक्या दिल्या पण भावेश डगमगले नाहीत. नंतर महाबळेश्वरला आलेल्या एका तरुण आणि नुकतंच लग्न झालेल्या जोडप्याला फ्लॉवर कँडल भेट देऊन त्यांचं मन त्याने जिंकलं.

दोन दिवसांनी त्या तरुणाचा ह्याला फोन - मी इन्फोसिसला आहे आणि येणाऱ्या दिवाळीत तुम्हाला न विचारता मी तुमचे दोन स्टॉल कंपनीत लावले आहेत - जेवढ्या मेणबत्त्या घेऊन येता येईल तेवढया घेऊन या-२४००० एम्प्लॉईज आहेत.झालं-या पठ्ठ्यानी दोन गाड्या भरून मेणबत्त्या नेल्या आणि बघता बघता आठ लाखाचा धंदा केला.व्यवसाय वाढत गेला आणि आज त्यांचा सनराईज कँडल्स  हा व्यवसाय कित्येक कोटी रुपये मूल्य आणि १०७०० प्रॉडक्ट्स  असलेला आहे, त्यांच्या भारतातील १४ राज्यात ७१ शाखा आहेत आणि २५०० अंध बांधव तिथे मेणबत्त्या बनवून खूप चांगली कमाई करतात.आणि ह्या माणसाचं ध्येय आहे २०२० पर्यंत २५००० अंध बांधवांना काम देण्याचं!भारतात आजही दहा हजार करोड रुपये मूल्याच्या मेणबत्त्या आयात होतात - इतकी मोठी ही बाजारपेठ आहे.आणि त्यांना खात्री आहे की त्यांचे प्रोडक्टस चीनसारख्या देशातील त्यांचे स्पर्धक बेंचमार्क करत असतील.

काय हा आत्मविश्वास! २००९ साली त्यांना रिलायन्स ग्रुपने सन्मानित केलं आणि एक्कावन्न लाख रुपयांचा चेक देऊ केला. पण ह्या पठ्ठ्याने तो नाकारला. त्यापेक्षा मला काम द्या अशी मागणी करून! आजतागायत ८३ कोटींचा व्यवसाय रिलायन्स कडून त्यांनी मिळवला आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! पहाटे चार वाजता उठून पत्नी नीता यांच्या मदतीने कारच्या बम्परला दोर बांधून चार तास रनिंग आणि इतर व्यायाम करून त्यांनी त्यांची तब्येत ठणठणीत ठेवली आहे. शॉर्टपुट या खेळात त्यांनी आजपर्यंत पॅरा ऑलिम्पिक मध्ये ११७ मेडल्स जिंकली आहेत आणि २०२० ला होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळवण्यासाठी त्यांची तयारी सुरू आहे. जगातील सगळ्यात मोठी २४० टन वजनाची मेणबत्ती बनवण्याचा आणि गिनीस बुक वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याचा (१५० किलो वजनाच्या मेणबत्तीचा सध्याचा रेकॉर्ड आहे) विडा त्यांनी उचलला आहे. त्यांचा आणखी एक धाडसी छंद आहे. गिर्यारोहण करण्याचा.माऊंट किलीमांजारो सारखे अतिशय कठीण ट्रेक त्यांनी केले आहेत आणि २०२० पर्यंत माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. जो परत एक वर्ल्ड रेकॉर्ड असेल!

आजच्या तरुणांच्या बोटातल्या वेगवेगळ्या रंगांच्या खड्यांच्या अंगठ्या बघून त्यांना आश्चर्य वाटते. करोडो किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रहांना दुसरं काही काम नाही का तुमचं भलबुरं करण्याशिवाय? असा परखड सवाल ते या तरुणांना विचारतात.स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवण्याचा सल्ला ते त्यांना देतात.आपल्याकडे जे आहे ते बेस्ट आहे. त्यामुळे त्याचा पुरेपूर उपयोग आणि फायदा करून घ्या असं ते कळकळीने सांगतात.अशा या महान ध्येयवेड्या उद्योजकाला आणि ह्या हिऱ्याला पैलू पडायच्या आधीच पारखणाऱ्या त्यांच्या अर्धांगी म्हणून खंबीर आणि तोलामोलाची साथ देणाऱ्या तेवढ्याच महान नीताजी यांना साष्टांग दंडवत! आधुनिक युगातले हे खरेखुरे लक्ष्मी नारायण आणि सत्यवान सावित्री!अतिशय विनोदी आणि विनम्र असलेला हा माणूस सुंदर शेरोशायरी रचतो आणि खुमासदार शैलीत ऐकवतो. त्यांच्या काही रचना...

"शब्दोंके समशेर चलाता हूँ, मैं पानीसे तसवीर बनाता हूँ

मैं कायर है वो जो किस्मतकी बात करते हैं, अरे किसमतकी तो खुद तसवीर बनाता हूँ मैं"

"शोहरतें कहाँ हर बार बुलंदीपे रहती हैजितनी उंँची इमारतें हो हर बार खतरें में रहती है, कौन बनेगा करोडपती ये कहना आसान हैमगर कौन बचेगा करोडपती ये कहना मुश्किल है"

"ये फुल मुझे विरासत में नहीं मिलेतुमने मेरा कांटों भरा बिस्तर नहीं देखाजबसे चला हूँ सिर्फ मंजिलों पे नजर हैमैंने कभी मीलका पत्थर नहीं देखाहैरत में पड जाएंगे सब जब मैं बेवक्त घरपे पहूंँच गयाक्योंकी अर्सा हो गया कभी मैंने दिनमें घर नहीं देखा मेहबूब की गली हो या बुजूर्गोंकी जमीनेंछोड दिया एक बार तो फिर मैंने मुडके नहीं देखा पत्थर समझता है मुझेमेरा हर चाहनेवालाअरे मैं मोम हूँ तुने मुझे छूकर नहीं देखा"

"आ कहीं मिलते है हम ताकी बहारें आ जायेइससे पहले की ताल्लूक में दरारे आ जायेये जो खुद्दारी का मैलासा अंगोछा है मेराबेच दुँ इसको तो कईँ कारें आ जायेदुष्मनी हो तो फिर ऐसी हो की कोई एक रहेलेकीन ताल्लूक हो तो ऐसा की पुकारें आ जायेजिंदगी दी है तो बस इतनी मोहलत दे देकी आप दोस्तोंका कर्ज उतारे फिर आ जायेऔर मुमकीन है की नींद में कहीं हम लेटे होठहेर जाना अगर कहीं रस्तेमें मजारे आ जाये"

- नितीन श्रोत्री

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News