एम. फील, पी.एचडी विद्यार्थ्यांना विद्यावेतन द्या; अन्यथा आंदोलन करणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 2 June 2020
  • मराठवाडा असोसिएशन फॉर स्टुडन्ट विद्यार्थी संघटनेचा इशार 

मुंबई: मराठा समाजाच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या ढिसाळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसला. अनेक विद्यार्थ्यांना एम. फील, पी. एचडीच्या विद्यावेतनाचा एकही हप्ता मिळाला नाही तर काहींना फक्त नोव्हेंबरपर्यंतचे विद्यावेतन मिळाले. संस्थेच्या नियमाप्रमाणे शिष्यवृत्ती धारकाला कुठेही नौकरी करता येत नसल्याने अनेकांनी खासगी नौकरी सोडली, त्यात अनेक महिने होऊनही सुरवातीला चौकशी व आता टाळेबंदीच्या नावाखाली विद्यावेतन देण्यास सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे. परिणामी अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली तर काही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ज्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळाले नाही त्यांना तात्काळ विद्यावेतनाची रक्कर देण्यात यावी अशी मागणी मराठवाडा असोसिएशन फॉर स्टुडन्ट विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष सादिक शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. 

सारथी संस्थेद्वारे ५०३ विद्यार्थ्यांना ३१ हजार प्रतिमाह संशोधक शिष्यवृत्ती मंजूर झाले. यातील ११ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०१९ कालावधीतील ८२ हजार १६७ रुपयांचा पहिला हप्ता काही विद्यार्थ्यांना नोव्हेंबर २०१९ मध्ये तर उर्वरित विद्यार्थ्यांना मार्च २०२० मध्ये देण्यात आला. मात्र आजून 70 विद्यार्थ्यांना पहिला हप्ता मिळालेला नाही. विद्यावेतन त्वरित मिळाले नाही तर सरकारविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा विद्यार्थ्यांनी दिला आहे. सारथी संस्थेबाबत सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप मराठा समाजातील विद्यार्थी केला.  

शिष्यवृत्ती धारकाला विद्यापीठीय वसतिगृहात राहता येत नसल्याने सर्व विद्यार्थी शहरात भाड्याने राहतात. अनेक महिन्यांचे भाडे थकल्याने घरमालक पैशाची मागणी करत आहे. विद्यापीठ, महाविद्यालय व शैक्षणिक संस्था पूर्ण क्षमतेने केव्हा सुरू होतील याची शाश्वती नाही. त्यामुळे प्रगती अहवाल सादर करण्यासाठी संशोधकांना मुदतवाढ देण्यात यावी. विद्यार्थ्यांचे १ डिसेंबर २०१९ ते ३१ मार्च २०२० पर्यंतचे उर्वरित विद्यावेतन व घरभाडे भत्ता बँक खात्यात जमा करावा. जेणेकरुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होता मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागणार नाही असे निवेदनात म्हटले आहे.  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News