फुप्फुसाचे व्यायाम कराच नाहीतर...

डॉ. राजीव शारंगपाणी,  क्रीडावैद्यक तज्ज्ञ
Monday, 22 April 2019

दमश्‍वासाच्या व्यायामामुळे फुप्फुसाची क्षमता वाढते. फक्त पोट फुगवून खोल श्‍वास घेणे व सोडणे, फक्त छाती फुगवून खोल श्‍वास घेणे व सोडणे, योगासनामधील पश्‍चिमोत्तानासन, धनुरासन, मत्स्येंद्रासनासारखी आसने केल्याने फुप्फुसाच्या सर्व भागांत हवा खेळती राहते आणि त्यातील वायुकोश हवेने फुगतात. 

गेल्या भागात आपण हृदयाचा व्यायाम पाहिला. स्नायूंची हालचाल अजिबात होत नसल्यास हृदयाला व्यायाम होत नसतो; पण नियमित व्यायामाचा हृदयावरच इष्ट परिणाम होतो; असे नाही, तर त्याहीपेक्षा जास्त चांगला परिणाम फुप्फुसांवर होतो. फुप्फुसे त्यांच्या पूर्ण क्षमतेनुसार सामान्य आयुष्यात वापरली जात नाहीत. फुप्फुसांचे कित्येक भाग पडीक राहतात. त्यामध्ये वर्षा वर्षात हवा भरली जातच नाही. मग, ते निकामी भाग रोगांचे घर होतात. वर्षानुवर्षे शहरात राहिल्यामुळे धूर शरीरात जाऊन फुप्फुसे काळी कुळकुळीत झालेली असतात. 

दमश्‍वासाच्या व्यायामामुळे फुप्फुसाची क्षमता वाढते. फक्त पोट फुगवून खोल श्‍वास घेणे व सोडणे, फक्त छाती फुगवून खोल श्‍वास घेणे व सोडणे, योगासनामधील पश्‍चिमोत्तानासन, धनुरासन, मत्स्येंद्रासनासारखी आसने केल्याने फुप्फुसाच्या सर्व भागांत हवा खेळती राहते आणि त्यातील वायुकोश हवेने फुगतात. 

उलटे लोंबकळणे, शीर्षासन, सर्वांगासन अशा प्रकारांमध्ये फुप्फुसांच्या मानेजवळच्या भागात रक्त जास्त जाते तर पोटाजवळच्या भागात हवा भरपूर जाते. त्यातून वायुकोश सतत कार्यान्वित राहतात. धूम्रपान करणाऱ्यांबरोबरच न करणाऱ्यांनाही सिगारेटचा धूर आणि काजळीचे अतिशय छोटे कण आता घ्यावे लागतात. त्यातून फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होते. बागेतील कचरा जाळण्यातून, वाहनांमधून बाहेर फेकल्या जाणाऱ्या धुराच्या लोटांमधून हवा खराब होते. त्याचा थेट दुष्परिणाम फुप्फुसांवर होताना दिसतो. 

काम ठीक चालते आणि एकंदरीतच शरीरस्वास्थ्य टिकते. दमश्‍वासाचे व्यायाम आपले आपण करू शकतो; पण त्यासाठी आसपासची हवा स्वच्छ असणे आवश्‍यक आहे. 

फुप्फुसांचे आरोग्य टिकल्यास शरीराला प्राणवायू योग्य प्रमाणात मिळतो. हृदयाचे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News