किशोरवयीन मुलांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर सर्वात कमी 0. 2 टक्के; काय आहे कारण... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 19 September 2020

20 वर्षाखालील तरुणाईत फक्त 10 टक्के कोरोनाची लक्षणे आढळून आली, त्यात मृत्यूचे प्रमाण फक्त 0.2 टक्के आहे, अशी माहिती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशने (WHO) दिली.

मुंबई : जगभर कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला, अनेकांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे लाखो व्यक्तींचा मृत्यू झाला, दिवसेंदिवस मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले, अशा परिस्थितीत एक समाधानकारक बातमी समोर आली. 20 वर्षाखालील तरुणाईत फक्त 10 टक्के कोरोनाची लक्षणे आढळून आली, त्यात मृत्यूचे प्रमाण फक्त 0.2 टक्के आहे, अशी माहिती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशने (WHO) दिली. डब्लूएचओने दिलेल्या माहितीनुसार तरुणांना  कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे, तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने दिलेली मार्गदर्शक तत्वे पालण करणे आवश्यक आहे.

मृत्यूदर कमी असण्याचे प्रमुख कारण...

कोरोना व्हायरसमुळे किशोरवयीन तरुणांना मृत्यू  होतो, मात्र आजपर्यंतच्या निरिक्षणावरून किशोरवयीन मुलांना कोरोनाची अत्यल्प लागण झाली, ज्यांना लागण झाली त्यांचा मृत्यू दर खूप कमी आहे. मृत्यूदर कमी असण्याचे प्रमुख कारण किशोरवयीन मुलांमध्ये न्यूट्रिशन आणि रोगप्रतिकारक शक्ती जास्त असणे आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झाला तरी इम्युनिटी पावरमुळे कोरोनाचे लक्षणे तरुणांना जाणवत नाही, कोणताही उपचार न करता रुग्ण आपोआप बरा होतो. तरीदेखील किशोरवयीन मुलांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे असे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे वैद्यकीय प्रमुख डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी सांगितले.   

किशोरवयीन मुलांना सुरक्षा देण्याची जबाबदारी ही फक्त वडिलांची आणि शाळेची नाही तर संपूर्ण समाजाची आहे. त्यासाठी सर्वांनी सामाजिक प्रयत्न करायला हवेत, सध्यातरी शाळा सुरू न करता दूर शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञान दिले पाहिजे असेही डब्ल्यू स्पष्ट केले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News