प्रेम हे इंद्रधनुष्यासारख असत : डॉ. मोहन देस 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 22 May 2020

तरुणाईच्या हक्काचं व्यासपीठ 'यिनबझ'वर मान्यवरांच्या खास मुलाखती घेण्यात येत आहेत. शुक्रवारी (ता. 22) फेसबुक लाईव्हद्वारे  डॉ. मोहन देस यांची मुलाखत घेण्यात आली. त्यांनी 'चांगले नातेसंबंध आणि तरुणाईच्या मनातील प्रश्न' या विषयावर तरुणाईशी संवाद साधला. नाते संबंध, प्रेम, शारीरिक बदल आदी विषयांवर तरुणाईशी संवाद साधला.

शरीर संबंध (सेक्स) केल्यानंतर प्रेमाच नात घट होते असा समज तरुण आणि तरुणी दोघांमध्ये देखील आहे. भविष्याचा कोणताही विचार न करता प्रेमीयुगल विवाहपुर्व  शरीर संबंध ठेवतात. त्यातून पुढे अनेक समस्या उद्धभवतात. शरीर संबंध ठेवल्यामुळे प्रेम घट होते हा गैर समज आहे. त्यामुळे प्रेम वाढत नाही तर अनेक समस्या निर्माण होतात. प्रेम हे इंद्रधनुष्यासारख असत. सात रंग एकत्र येऊन इंद्रधनुष्य बनतो. तस आकर्षन, विश्वास, जीव्हाळा, जबाबदारी, आधार, स्वतंत्र, मुक्तता, उत्साह, आनंद, सन्मान, विवेक असे विविध घटक मिळून एक सुंदर प्रेम निर्माण होत. प्रेमात हिंसा, जबरदस्ती, विश्वासघात याला थारा नसतो  डॉ. मोहन देस असे  यांनी सांगीतले.  

तरुणाईच्या हक्काचं व्यासपीठ 'यिनबझ'वर मान्यवरांच्या खास मुलाखती घेण्यात येत आहेत. शुक्रवारी (ता. 22) फेसबुक लाईव्हद्वारे  डॉ. मोहन देस यांची मुलाखत घेण्यात आली. त्यांनी 'चांगले नातेसंबंध आणि तरुणाईच्या मनातील प्रश्न' या विषयावर तरुणाईशी संवाद साधला. नाते संबंध, प्रेम, शारीरिक बदल आदी विषयांवर तरुणाईशी संवाद साधला.

तरुणाला एखादी मुलगी आवडली की तीच्यासोबत संवाद वाढवला जातो. काही दिवसांनी फुल, चिठ्ठी किंवा विशेष नियोजन करुन प्रेम व्यक्त केल जात. प्रेम व्यक्त केल्यानंतर विचार करण्यासाठी मुलगी काही वेळ घेते. त्यानंतर होकार दिला जातो. तीने होकार दिल्यावर पुरुष तीच्यावर मालकी हक्क गाजवायला सुरुवात करतो. प्रियसीने काय घालाव?, कस राहाव? कोणाशी बोलव? काय कराव? हे सर्व निर्णय प्रियकर घेतो. तेव्हा प्रेमात ठिणगी पडायला सुरुवात होते, असे मत देस यांनी व्यक्त केले. 

सौंदर्य म्हणजे काय?

पिळदार शरीर, उंच बांधा, कणखर आवाज, सुट, बुट, कोट असा दिसनारा पुरुष म्हणजे पुरुषी सौदर्य होय. झिरो फिगर, टपोरे डोळे, सुडोल बांधा, लिप्सटीक, मस्करा, लिप लायनर, आय लायनर,  आयशाडो, काजळ, फेस पावडर लावणारी मुलगी म्हणजे स्त्री सौदर्य होय असा समज तरुणाईत आहे. असा समज जाहीरातीमुळे निर्माण झाला. पण हा समज चुकीचा आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News