लव्ह इन क्वॉरंटाईन शॉर्टफिल्म

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 June 2020

कारण कोरोना महामारीमध्ये पोलिस, पालिकेचे कर्मचारी व कामगार तसेच डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवेतील कर्मचारी यांचे योगदान मोठे आहे. आता कोरोनाबाबतचे अनुभव सांगणारी लव्ह इन क्वॉरंटाईन ही शॉर्टफिल्म बनविण्यात आली आहे.

मुंबई - सध्या कोरोना, क्वॉरंटाईन, लॉकडाऊन.....असे सारे शब्द सारखे आपल्याला सगळीकडे ऐकू येत आहेत. सर्वसामान्य जनतेपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळेच्या ओठी आणि तोंडी हे शब्द परवलीचे झाले आहेत. त्यामुळे या सगळ्याच बाबींची दखल हिंदी चित्रपटसृष्टी कशी काय घेणार नाही....ती नक्कीच घेणार आणि घेतली आहे. आतापर्यंत काहींनी यावर चित्रपट आणि लघुपट बनविले आहेत. काहींनी खास गाणी बनवून कोरोना योध्दांना प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले आहे. कारण कोरोना महामारीमध्ये पोलिस, पालिकेचे कर्मचारी व कामगार तसेच डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवेतील कर्मचारी यांचे योगदान मोठे आहे. आता कोरोनाबाबतचे अनुभव सांगणारी लव्ह इन क्वॉरंटाईन ही शॉर्टफिल्म बनविण्यात आली आहे. निर्माते निलेश एन. रघानी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरचे काही अनुभव आणि घडलेल्या घडामोडीचे चित्रण आपल्या लव्ह इन क्वॉरंटाईन या लघुपटात केले आहे. एन. आर. ग्रुपची ही प्रस्तुती आहे तर क्लासिक ट्रेजर प्रा. लि. या बॅनरखाली ती बनविण्यात आली आहे. राजीव एस. रुईया यांनी ती लिहिली आहे आणि त्यांनीच ती दिग्दर्शित केली आहे. कोरोनाबाबतचे विविध अनुभव यामध्ये आहेत. ही शाॅर्टफिल्म वेबिनारच्या माध्यमातून एक हजार डाॅक्टर्सना दाखविण्यात आली आहे आणि आता ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येईल. यामध्ये ऋतू जेंजानी व करण उदय जेंजानी यांनी काम केले आहे. या फिल्मचे प्रोजेक्ट डिझायनर दीपक रुईया, डीओपी जावेद एहतेशाम यांचे आहे. निर्माते नीलेश रघानी म्हणाले, की लाॅकडाऊनमध्ये आम्ही बारकाईने अवलोकन केले. सर्व टीमने घरी बसून काम केले. गरजेनुसार सरकारी यंत्रणांच्या पूर्व परवानगीने सर्व काही केले असून प्रेक्षकांनी नक्कीच ही कलाकृती बघावी अशी आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News