प्यार के लिये दील बडा होना चाहिए

दिपाली ताई
Wednesday, 31 July 2019

अफेर, सेक्स, टाइमपास, फसवणुक, इमोशनल अत्याचार या सगळ्यांपेक्षा प्रेम आणि नात्यातील विश्वास जपता आला पाहिजे.

प्रेम हा शब्द कधीतरी पारखून पहा. सेक्स, वासना व्यभिचार यालाच आजकाल स्थान आहे. विचार करा. निखळ प्रेम आणि वासना यात किती फरक आहे. हे प्रेम फक्त स्त्री पुरूष मर्यादित ठेवू नका. इतका संकुचित विचार प्रेमात कधीच करू नये. सगळ्यांवर प्रेम करता आल पाहिजे. लहान मुलाच्या लहानपणावर त्याच्या निर्मळ हसण्यावर फुलाच्या कळीवर तुटलेल्या फुलावरही प्रेम करता आल पाहिजे. माणसाच्या दुर्गुणावरही प्रेम करता आल पाहिजे.

सुंदरतेवर कोणीही प्रेम करू शकत. कुरूप रूपावरही प्रेम करता याव इतक मोठ मन फक्त प्रेमातच मनुष्य मिळवू शकतो म्हणूनच दिल बडा होना चाहिए. ज्याच्या मनात वासनेपेक्षाही भावनेला प्रेमाला जास्त महत्व आहे. तो कधीही कुणाच वाईट करू शकत नाही. ज्याच्यावर प्रेम करते. करतो त्याचं विश्वास जपन त्याला धोका न देणे म्हणजे प्रेम, आयुष्यभर साथ देण, एकमेकांसाठी जगणं म्हणजे प्रेम म्हणून प्रेम हा शब्द जगा अगदी मनापासून भरभरून जगा. कुठल्याही विचाराला चांगल्यापध्दतीनं वळवता आल पाहिजे.

कुणालाही मनापासून जपता आल पाहिजे. प्रेम जपायला शिकवत. तत्वाने जगायला शिकवत बाकी सगळ्या गोष्टी व्यर्थ.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News