प्रेम दिवानी

अनिकेत जयंतराव देशमुख
Monday, 23 September 2019

नयनांची भाषा ओळखणारी वेडी प्रेम दिवानी तू
मी अल्लड-उनाड वाऱ्यापरी अळवावरील पाणी तू 

ध्यानी - मनी सजणा-या स्वप्नांमधली राणी तू
हृदयामध्ये गुंजणा-या  सरगम मधली गाणी तू...

नयनांची भाषा ओळखणारी वेडी प्रेम दिवानी तू
मी अल्लड-उनाड वाऱ्यापरी अळवावरील पाणी तू 

स्वार्थी जगी खरी प्रीत जपते माझी प्रेम कहाणी तू...
हर्ष सुखामध्ये तरळणारे  लोचनांतील पाणी तू

घराला त्या घरपण देणारी  सौभाग्याची उखाणी तू 
जीवनाला या साद घालणारी  माझी ती फुलराणी तू...
दुःखामध्ये मज सावरणारी खंबीर सौदामिनी तू 

समईच्या वातीसम जळते माझी गं जिंदगाणी तू 
अनुश्वासातून उमटणारी हरवलेली वाणी तू....

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News